आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेबी बंप फोटोशूटमध्ये उर्मिलाचे दिसले 'मातृत्वाचे' सौंदर्य, आदिनाथ म्हणतो, 'छकुली'साठी काहीही करेन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी इंडस्ट्रीतील क्युट कपल आदिनाथ आणि उर्मिला कोठारे यांना कन्यारत्न प्राप्त झाले आहे. त्यामुळे सध्या या दोघांसह कोठारे कुटुंबीय आणि  त्यांचे चाहतेही फारच उत्साहात आहेत. गुरुवारी मुलीच्या जन्मानंतर उर्मिला कोठारेचा बाळंतपणाचा एक फोटो समोर आला. तेजस नेरुरकरने क्लिक केलेल्या या फोटोमध्ये उर्मिलाने बेबी बंपसह पोज दिली. #mother असे कॅप्शन देऊन तेजसने हा फोटो शेअर केला आणि त्यात उर्मिलाचे मातृत्वाचे सौंदर्य दिसून आले. आदिनाथने सांगितले पहिल्यांदा मुलीला हातात घेतले तेव्हा काय वाटले?..

 

आदिनाथ आता 'डूड' वरुन 'डॅडी' झाला आहे आणि त्यानिमित्त त्याने दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, जेव्हा मुलीला सर्वप्रथम हातात घेतले तेव्हा आकाशात एखाद्या चमकणाऱ्या ताऱ्यालाच पाहतोय की काय अशी फिलींग मनात आली. मला तिचे वजन करायला घेऊन जायचे होते आणि ती माझ्या खांद्यावर निजली होती. आता तिला दिलेले सर्व वचन पूर्ण करण्याची वेळ आली आहे असे मला वाटले. तिच्याबद्दल विचारल्यावर मी काय बोलु मला तेच समजत नाही. 

 

बाळंतपणात आदिनाथने घेतली सर्वोतपरी काळजी..
उर्मिलाने बाळंतपणाक आदिनाथ तिला अगदी राणीप्रमाणे ठेवतो अशी कबुली उर्मिलाने दिली. तर आता बाळासाठी काहीही करण्याची तयारी आहे. मी आणि उर्मिला आता आमच्यातील आई-बाबा आणि त्यांचे काम सध्या शिकण्याच्या प्रयत्नात आहोत आणि त्यातही एक वेगळीच मजा येत आहे असे आदिनाथ सांगतो. 

 

कोठारे कुटुंबीयात मुलीच्या आगमानाने आले आनंदाला उधाण..
 आदिनाथने सांगितले की, म्हटले, "आमच्या घरात मुलगी नव्हती. मी एकटाच असल्याने आता आई-बाबांच्या मुलीची इच्छा पूर्ण झाली आहे आणि आमची छकुलीही एकदम बाबा (महेश कोठारे) यांच्यावर गेली आहे. "कोठारे कुटुंबियात सध्या बाळाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु असल्याचे आदिनाथने सांगितले.

 

 पुढच्या स्लाईडवर पाहा, उर्मिला आणि आदिनाथचे काही खास फोटोज्..

बातम्या आणखी आहेत...