आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TellyWorld:'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर झी मराठीवरील आवडत्या नायिकांची हजेरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 झी मराठीमराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या दजेदार कार्यक्रमामधून सकस विनोद जगभरातील मराठी प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमात सादर होणारी विविध विनोदी स्कीट्स आणि त्यात सहभागी होणा-या निलेश साबळे, श्रेया बुगडे, भाऊ कदम, कुशल बद्रीके, भारत गणेशपुरे, आवण सागर कारंडे, या कलाकारांनी या कार्यक्रमाचा दर्जा वाढविला आहे.


झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ची जादू आता केवळ मराठी कार्यक्रमांपुरता मर्यादीत राहिली नाही. आजवर अनेक मराठी कार्यक्रम, चित्रपटातांना हक्काचे व्यासपीठ या कार्यक्रमाने उपलब्ध करुन दिले आहे. आगामी भागात प्रेक्षकांच्या लाडक्या अत्रिनेत्री अनिता दाते केळकर, रसिका सुनील, अक्षया देवधर, धनश्री काडगावकर यांनी मंचावर हजेरी लावली आहे. यावेळी कार्यक्रमात सर्व कलाकारांनी धम्माल करत अनेक गेम्सही खेळले. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमादरम्यानचे काही खास फोटोज्..

बातम्या आणखी आहेत...