आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मधुबालाच्या जीवनाच्या अखेरच्या काळात केवळ नर्स आणि ड्रायव्हर होते सोबतीला, प्रेमात नेहमी मिळाला धोका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 14 फेब्रुवारी 1933 साली बॉलिवूडच्या सर्वात सुंदर अभिनेत्रींमध्ये समाविष्ट असलेल्या मधुबाला यांचा जन्म झाला होता. तसे पाहिले तर व्हॅलेंटाईन डेला प्रेमाचा दिवस समजला जातो पण मधुबालाच्या छोट्या बहिणीने सांगितल्यानुसार, मधुबाला जीवनभर खऱ्या प्रेमासाठी तरसत राहिली. एका मुलाखतीत त्यांनी या गोष्टीचा खुलासा केला की मधुबालाला केवळ दिलीप कुमारने नव्हे तर किशोर कुमारनेही धोका दिला. दिलीप कुमार यांच्या या अटीने मधुबालाने गमावले प्रेम..

 

मधुबालाच्या बहिणीने सांगितले की मधुबाला आणि दिलीप कुमार यांचे नाते बी. आर. चोप्रा यांचा चित्रपट 'नया दौर'मुळे तुटले, वडील अताउल्लाह खानमुळे.

 

मधुबालाच्या बहीणीने सांगितले की मधुबालाचे दिलीप कुमार यांच्यासोबतचे नाते वडिलांच्या एका जिद्दीमुळे तुटले. नया दौर या चित्रपटाच्या शूटिंगचा काही भाग पूर्ण झाल्यावर मेकर्सला ग्वाल्हेर येथे या चित्रपटाचे शूटिंग करावयाचे होते. हा भाग दरोडेखोरांमुळे कुप्रसिद्ध असल्याने  वडिल मधुबालाला तिथे पाठवण्यास तयार नव्हते. त्यांनी मधुबालाला फिल्ममेकर्सचे पैसे परत करण्यास सांगितले. त्यावेळी मधुबाला आणि दिलीप कुमार यांचा साखरपुडा झाला होता. तेव्हा फिल्ममेकर बी. आर. चोप्रा यांनी दिलीप कुमार यांना मधुबालाला समजवण्यास सांगितले. पण मधुबाला वडिलांच्या विरुद्ध जाण्यास तयार नव्हती. तेव्हा चोप्रा प्रोडक्शनने मधुबालाविरुद्ध केस फाईल केली आणि ती केस जवळपास 1 वर्षापर्यंत चालली. यादरम्यान दिलीप कुमार आणि मधुबालाच्या नात्यात वितुष्ट आले.

 

- दिलीप कुमार यांनी मधुबालाला चित्रपट सोडून त्यांच्यासोबत लग्न थाटण्यास सांगितले पण तेव्हा मधुबालाने दिलीप कुमार यांना तिच्या वडिलांची माफी मागण्यास सांगितली आणि त्यानंतरच लग्न करणार असे सांगितले. पण दिलीप कुमार यांनी ही माफी मागण्याचे नाकारले आणि त्यांचे मार्ग वेगळे झाले. असे म्हणतात की मधुबालाने तिच्या जीवनाच्या अखेरपर्यंत दिलीप कुमार यांच्यावर प्रेम केले. 

 

पुढच्या स्लाईडवर वाचा, किशोर कुमार यांनी मधुबालासाठी इस्लाम धर्म स्वीकारला..

 

 

 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...