आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Tuza Maza Breakup: अभिनेता नसता तर या फिल्डमध्ये साईंकितने कमावले असते नाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘रात्रीस खेळ चाले’ या लोकप्रिय मालिकेतील अभिरामची भूमिका करणाऱ्या हॅण्डसम अभिनेता साईंकित कामतने त्याच्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली. सध्या साईंकित झी मराठी वाहिनीवरील  ‘तुझं माझं ब्रेकअप’च्या निमित्ताने सोमवार ते शनिवार रात्री ८.३० प्रेक्षकांच्या भेटीला येतो. या मालिकेतून तो समीरची व्यक्तिरेखा रंगवतो आहे. असं म्हणतात की प्रेम हे आंधळं असतं आणि लग्नानंतर डोळे उघडतात तसंच काहीसं समीर आणि मीरा बाबतीतही झालेलं प्रेक्षकांनी पाहिलं. लग्नानंतर सुरु झालेली संसाराची तारेवरची कसरत,  लग्नाआधी एकमेकांच्या अवगुणांवर पडदा टाकणारे हे दोघे लग्नानंतर कोणताही आडपडदा न ठेवता एकमेकांच्या चुका काढून भांडायला लागतात आणि बघता बघता हे भांडण एवढ्या टोकावर जातं की ते दोघे वेगळे होतात. या मालिकेच्या निमित्ताने त्याच्याशी मारलेल्या या गप्पा.

 

 * ‘तुझं माझं ब्रेकअप’ मालिका खूप लोकप्रिय झाली आहे. या मालिकेत प्रेक्षकांना आता कोणता ट्विस्ट पाहायला मिळणार आहे?
- 'तुझं माझं ब्रेकअप' मालिकेच्या कथानकात नेहमीच प्रेक्षकांना नवनवीन ट्विस्ट्स अँड टर्न्स पाहायला मिळतात. खरंतर समीर हा आता घरात एकटा पडला आहे. त्याच्या बाजूने कुणीही नसल्याचं त्याला जाणवत आहे. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास कुठेतरी हरवला आहे. समीरच्या अशा वागण्यामुळे मला अनेक चाहत्यांचे प्रश्न येतात की, समीर स्टँड का घेत नाहीये? तो ठोस काहीतरी निर्णय का घेत नाहीये. पण, आता फक्त मी एवढंच सांगू शकतो की, वेट अ‍ॅण्ड वॉच लवकरच कळेल की मालिकेत अजून काय काय होणार आहे ते.

 

 * मालिका आजच्या पिढ्यातील विवाहित जोडप्याचं छोट्या पडद्यावर प्रतिनिधित्व करते, अशी मालिका मिळाल्यावर तुझी प्रतिक्रिया काय होती?
-  खरंतर सध्याच्या युवापिढीचा विचार केला तर असं लक्षात येतं की, प्रेम, ब्रेकअप या गोष्टी सध्या सगळीकडेच सुरू आहेत. त्यांना त्यांच्यासमोर उभे ठाकलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत. याला जबाबदार आहे सध्याची परिस्थिती. कामाचा ताण, दुरावलेला संवाद यामुळे दोन प्रेमी जीवांची मनं दुरावतात. त्यामुळे मला हा काहीसा नवा विषय वाटला. युवापिढीला रूचेल, पटेल असा वाटला, म्हणून मी लगेचच मालिकेसाठी होकार देऊन टाकला.

 

बातम्या आणखी आहेत...