आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटीआरपीसोबतच लोकप्रियतेचं शिखर गाठलेल्या 'तुझ्यात जीव रंगला' या झी मराठीवरील रसिक प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकेने नुकतंच ५०० भागांचा टप्पा पार केला. राणादा आणि पाठकबाई यांच्यावर सबंध महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करतात. ऑनस्क्रीन भोळा तसेच रांगडा दिसणारा पेहलवान पठ्ठा राणादा ऑनस्क्रीन अगदी खरा पेहलवान कुस्तीपटू दिसण्यासाठी त्याच्या फिटनेस आणि डाएटकडे खूप लक्ष देतो.
आपला फिटनेस फंडा शेअर करताना राणादा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी म्हणाला, "मी शूटिंग संपल्यानंतर नियमितपणे जिमला जातो. जिमला जाणं मी कधीच टाळत नाही तसेच वर्कआऊट करताना मी एकाच अवयवावर लक्ष केंद्रित न करता संपूर्ण शरीराचा व्यायाम करतो. चपळपणासाठी मी योगा देखील करतो त्यामुळे शरीराला स्टिफनेस येत नाही. तसेच तालमीचे सिन शूट करताना सूर्यनमस्कार करावे लागतात तसेच डीप्स मारावे लागतात त्यामुळे हे व्यायाम जास्त करण्याकडे माझा भर असतो.
पुढे वाचा, काय आहे हार्दिकचा डाएट प्लान...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.