आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पडद्यामागील गोष्टी: अशोक सराफ यांनी गोव्यात केले होते लग्न, ट्रेनमध्ये पोलिसांनी घेतली फिरकी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक मराठी अकादमीतर्फे संपन्न झालेल्या 'शोध मराठी मनाचा' या संमेलनाच्या निमित्ताने माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची राज ठाकरे घेणार असलेली मुलाखत बुधवारी (21 फेब्रुवारी) पार पडली. पुण्यात पार पडलेल्या या कार्यक्रमात मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

 

गेल्या 40 वर्षांपासून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खदखदून हसायला लावणारे तर कधी चटकन डोळ्यात पाणी आणायला लावणारे मराठी सिनेसृष्टीतील चतुरस्त्र अभिनेते अशोक सराफ आता 70 वर्षांचे आहेत. अशोक सराफ यांनी त्यांच्या फिल्मी करिअरमध्ये अडीचेशेहून अधिक सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. अगदी विनोदी भूमिकांपासून ते खलनायकी भूमिका त्यांनी साकारल्या आहेत. हिंदी सिनेमे, मालिकांमध्येही ते रमले. पडद्यावर विविधांगी भूमिका साकारणारे अशोक सराफ खासगी आयुष्यात मात्र अतिशय शांत स्वभावाचे आहे. मीडियापासूनही ते कायम लांब राहतात. त्यांच्या खासगी आयुष्याविषयी त्यांच्या चाहत्यांना फारसे काही ठाऊक नाहीये. या पॅकेजमधून आम्ही वाचकांना अशोक सराफ यांच्या खासगी आयुष्याशी निगडीत पडद्यामागील खास गोष्टी सांगत आहोत. 

 

पत्नीपेक्षा 18 वर्षांनी मोठे आहेत अशोक सराफ
अशोक सराफ यांचे लग्न अभिनेत्री निवेदिता जोशी यांच्याशी झाल्याचे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. मात्र अशोक सराफ त्यांच्यापेक्षा वयाने तब्बल 18 वर्षांनी मोठे असल्याचे फार जणांना ठाऊक नसावे. अशोक सराफ यांचा जन्म 4 जून 1947 रोजी झाला. तर निवेदिता जोशी-सराफ यांचा जन्म 6 जून 1965 चा आहे. या दोघांच्या वयात तब्बल 18 वर्षांचे अंतर आहे. विशेष म्हणजे 1971 साली अशोक सराफ यांचा 'दोन्ही घरचा पाहुणा' हा सिनेमा रिलीज झाला होता. त्यावेळी त्यांचे वय 24 वर्षे होते. तर निवेदिता सराफ 1971 साली केवळ सहा वर्षांच्या होत्या. पुढे सिनेसृष्टीत एकत्र काम करत असताना निवेदिता आणि अशोक सराफ एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केले.


पुढील स्लाईड्सवर वाचा... 
- गोव्यात लग्न करण्यामागे होते खास कारण...
- महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये तोंड लपवून करावा लागला होता प्रवास...
- 25 वर्षांपूर्वी झाला होता मोठा अपघात... यासह अशोक सराफ यांच्याविषयी बरंच काही..

बातम्या आणखी आहेत...