आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदिनाथ-उर्मिलाच्या घरी आली नन्ही परी, कोठारे कुटुंबात आनंदाची लहर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या अनेक दिवसांपासून उर्मिला कोठारे आणि तिच्या प्रेग्नेंसीबद्दल मराठी चाहत्यांना उत्सुक्ता लागली होती. आज उर्मिलाने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे यामुळे तिच्या सर्व चाहत्यांमध्ये आनंदाची लहर आहे. मराठी इंडस्ट्रीत असलेले हे क्युट कपल आज आईबाबा झाले आहेत. तर महेश कोठारे आजोबा झाले आहेत. 

 

उर्मिला प्रेग्नेंसीच्या काळातही उर्मिला सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टीव्ह होती आणि तिच्याबद्दल सर्व माहिती फॅन्सला वेळोवेळी देत असे. उर्मिलाचा नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला ज्यात ती तिच्या संपूर्ण कुटुंबासोबत दिसली होती.आता उर्मिलाच्या मुलीची झलक पाहण्यासाठी तिचे चाहते आतूर झाले आहेत. या नव्या पाहुण्याच्या स्वागताची सध्या जोरदार तयारी कोठारे कुटुंबात सुरू आहे. 

 

लग्नाच्या सहा वर्षांनी आई झाली उर्मिला...
उर्मिला आणि आदिनाथ यांचे हे पहिले बाळ आहे. 20 डिसेंबर 2011 रोजी ही जोडी विवाहबद्ध झाली होती. लग्नाच्या 6 वर्षांनी उर्मिला आई झाली आहे. उर्मिलाच्या कुटुंबाने नुकतेच बेबीशॉवर सेलिब्रेट केले होते.  

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, उर्मिलाच्या बेबीशॉवरचे काही निवडक फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...