आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उर्मिलाच्या 'जीजा'चे हे गोंडस रुप पाहून तुम्ही पडाल प्रेमात, फॅन्सचे या कारणासाठी मानले आभार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी अभिनेत्री उर्मिला कोठारेची मुलगी जीजाचे बारसे छान धामधुमीत पार पडले. पारंपारीक मराठी वेशभुषेत उपस्थित असलेल्या सर्वच पाहुण्यांनी कोठारे कुटुंबियांच्या या छकुलीचे स्वागत करण्यात काहीच कमी ठेवली नाही. उर्मिलाने नुकताच एक फोटो सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे आणि त्यात तिच्या मुलीवर प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या सर्व फॅन्सचे आभार मानले आहेत. सोबतच उर्मिलाने तिच्या मुलीचे नाव जीजा असे ठेवले आहे आणि हे नाव सर्वाच्याच फार पसंतीस पडले. याबद्दलही तिने फॅन्सचे आभार मानले. 

 

गुढीपाडव्या्च्या शुभमुहुर्तावर उर्मिलाने तिच्या मुलीचे नामकरण केले आहे. लग्नाच्या सहा वर्षानंतर उर्मिलाने मुलीला जन्म दिला आहे. उर्मिलाने सोशल मीडियावर तिच्या मुलीचे फोटो शेअर केले आहेत. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, उर्मिला कोठारेने शेअर केलेले काही खास Photos..

बातम्या आणखी आहेत...