आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेकाळी उर्मिलाने नाकारले होते 'या' दिग्दर्शकाचे लव्ह प्रपोजल, 42व्या वर्षी मुस्लिम तरुणासोबत थाटला संसार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडच्या ग्लॅमरस दुनिया जेवढी चकचकीत दिसते तितकेच ती दुःखही देते असे सर्वचजणांचे म्हणणे आहे. आज  आम्ही एका एकतर्फी प्रेमकहाणीविषयी माहिती आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. ती कहानी आहे दिग्दर्शक राम गोपाल वर्मा आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांची. उर्मिला आज 4 फेब्रुवारी रोजी तिचा 44वा वाढदिवस साजरा करत आहे. असे म्हणतात की, दिग्दर्शक राम गोपाल वर्माचे उर्मिलावर एकतर्फी प्रेम होते. उर्मिलाने नाकारले लव्ह प्रपोजल..
 
 बीटाऊनमध्ये उर्मिला आणि रामगोपाल वर्मा यांच्या अफेअरची खूप चर्चा झाली. असेही म्हटले जाते की, रामू त्यांच्या चित्रपटात केवळ उर्मिलालाच घेत असत. एकदा उर्मिलासाठी राम गोपाल वर्मा यांनी माधुरी दीक्षितलाही चित्रपटातून काढून टाकले होते. नंतर कळाले की रामू यांचे उर्मिलावर खूप प्रेम होते म्हणून त्यांनी माधुरी दीक्षितला चित्रपटांतून काढले होते. जेव्हा त्यांनी उर्मिलाला लग्नासाठी मागणी घातली तेव्हा उर्मिलाने ती मागणी धुडकावून लावली आणि त्यांच्यासोबत चित्रपट साईन करणेही बंद केले. सध्या उर्मिला चित्रपटांपासून दूर आहे आणि काश्मीरी बिझनेसमन मोहसिन अख्तरसोबत विवाहबद्ध आहे. लग्नानंतर फार कमी वेळेस उर्मिला कोणत्या इव्हेंटमध्ये दिसते. उर्मिलाने 'रंगीला' (1995), 'दौड़' (1997), 'सत्या' (1998), 'मस्त' (1999), 'जंगल' (2000), 'प्यार तूने क्या किया' (2001), 'भूत' (2003), 'एक हसीना थी' (2003) या्ंसारख्या चित्रपटात काम केले आहे.
 
 पुढच्या स्लाईडवर पाहा, उर्मिलाचे काही खास PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...