आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आणखी एका मराठी अभिनेत्रीचा कास्टींग काऊचबाबत खुलासा, पैसे नव्हे थेट शरीरसंबंधांची केली मागणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील काही दिवसांपासून कास्टींग काऊचचा मुद्दा फार गाजत आहे. केवळ बॉलिवूड सेलिब्रेटीज नव्हे तर संसदेपर्यंत या प्रकरणाचे लोण पसरले आहेत. कोणी अभिनेत्रीने कास्टींग काऊचबद्दल टॉपलेस होऊन प्रदर्शन केले, तर कोणी ट्वीटरवर नाराजी व्यक्त केली. कोरिओग्राफर सरोज खान यांनी केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेस नेता रेणुका चौधरी यांनी यावर त्यांचे मत सांगितले होते. यात अगोदरच कंगना राणावत यांसारख्या यशस्वी अभिनेत्रींनीही त्यांचे मत मांडले आहेत आणि त्यांच्याविरुद्ध झालेल्या घटनेचा निषेध केला आहे. नुकतेच राधिका आपटेनेही  तिचा कास्टींग काऊचचा अनुभव सांगितला आहे. यानंतर राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री उषा जाधवनेही तिच्यासोबत घडलेल्या प्रसंगाचे वर्णन केले. 

 

उषा जाधवने सांगितले की, फिल्म इंडस्ट्रीमध्ये कास्टींग काऊच फार सामान्य गोष्ट आहे. हे पण खरे आहे की, ताकदवान लोक कास्टींग काऊच करतात. उषा जाधवने एका मुलाखतीत सांगितले की, ती एका चित्रपटाच्या कामानिमित्त एका माणसाला भेटायला गेली तेव्हा त्याने कामाच्या मोबदल्यात आम्हाला काय मिळणार, असा प्रश्न केला.

 

या प्रश्नावर गांगारुन गेल्यानंतर उषाने त्या व्यक्तीला उत्तर दिले की, माझ्याकडे पैसे नाहीत. ते ऐकून त्याने नाही पैसे नाही पाहिजे पण काम पाहिजे असेल तर तुला दिग्दर्शक किंवा निर्मात्यासोबत किंवा या दोघांसोबत शय्यासोबत करावी लागेल.

 

पुढच्या स्लाईडवर वाचा, अभिनयासाठी मुंबईला पळून आली होती उषा जाधव...

बातम्या आणखी आहेत...