आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

#BBDay7:पहिल्या नॉमिनेशनमध्ये उषा नाडकर्णीची आगपाखड, अनिल थत्ते-राजेशला घेतले फैलावर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना घरातील सहा सदस्यानी नॉमिनेट केले होते. घरातील सर्व सदस्यांवर यामुळे नाराज झालेल्या उषाताई यांनी महेश मांजरेकर यांच्यासोबतच्या रविवारी झालेल्या एपिसोडमध्ये घरातील इतर सदस्यांना फैलावर घेतले. उषाताई यांनी घरातील सदस्य तोंडावर गोड बोलतात आणि त्यानंतर मध्ये जाऊन नॉमिनेट करतात असा आरोप केला. यावर महेशम मांजरेकर यांनी उषाताई यांना विचारले असता त्यांनी सर्वप्रथम थत्ते यांच्यावर बरसल्या. 

 

उषा नाडकर्णी यांच्यावर किचनमध्ये लुडबुड केल्याचा आणि दडपशाहीचा केला आरोप..
उषा नाडकर्णी या नॉमिनेट झाल्यामुळे फारच इमोशनल झाल्या होत्या आणि यावेळी महेश मांजरेकर यांनी इतर सदस्यांना त्यांना का नॉमिनेट करण्यात आले असे विचारले तेव्हा उषा ह्या इतर सदस्य किचनमध्ये काम करत असताना सारखे त्यांना सुचना करत असतात तर उषाताई यांच्या वयाचा विचार करुन घरातील इतर सदस्य त्यांच्या दडपणाखाली राहतात असे म्हटले. यावेळी राजेश इतर सदस्यांच्यावतीने उषाताई यांना बोलत होत तेव्हादेखील उषाताई चिडल्या होत्या. 

 

अनिल थत्ते यांनी म्हटले होते खाष्ट सासू..
उषाताई महेश मांजरेकर यांनी अनिल थत्ते यांच्याविषयी विचारले असता त्यांनी बोलायला सुरुवात केली आणि माझ्याविषयी कोणतीही माहिती नसताना माझ्याबद्दल वेडेवाकडे बोलण्याचा सल्ला कोणी दिला असे म्हटले. यावेळी घरातील इतर सदस्यांनीही उषाताईंना सपोर्ट केला. यापैकी रेशम टीपणीसने थेट अनिल थत्ते यांना 'चक्रम' असे संबोधले. यावेळी विनीत भोंडेनेही अनिल थत्ते हे द्वीतोंडी आहेत.  

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, नॉमिनेशनवेळी बिग बॉस मराठी घरातील फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...