आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैभव तत्ववादी झळकणार नव्या भूमिकेत, प्रकाश कुंटे करणार दिग्दर्शन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या दिलखेच अदांनी महाराष्ट्रातील तमाम तरुणींच्या मनावर अधिराज्य गाजवणार्‍या वैभव तत्ववादीचा आणखी एक नवा कोरा चित्रपट येऊ घातला आहे. पण या चित्रपटात वैभव कोणत्याही रोमँटिक भूमिकेत नसून एका वेगळ्याच भूमिकेत तो आपल्याला दिसणार आहे. एका आर्किटेकची भूमिका तो साकारणार अाहे. ‘कॉफी आणि बरंच काही’ या चित्रपटाचेे दिग्दर्शक प्रकाश कुंटे हेच या नव्या कोर्‍या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असून पुढच्या महिन्यापासून या चित्रपटाचं चित्रिकरण सुरू होणार असल्याचं सांगण्यात येतंय. 

 

कॉफी आणि बरंच काही, मिस्टर आणि मिस सदाचारी या चित्रपटांमधून वैभवने रोमँटिक भूमिकेतून महाराष्ट्रातील तरुणींना फिदा केलं होतं. शिवाय, विविध चित्रपटांमधूनही वैभवने विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. या नव्या चित्रपटाविषयी बोलताना वैभवने सांगितले की, आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा या चित्रपटातील माझी आर्किटेकची भूमिका फारच वेगळी आहे. त्यामुळे या चित्रपटासाठीही मीसुद्धा फार उत्सुक आहे. 

हंटर, बाजीराव मस्तानी, लिपस्टिक अंडर माय बुरखा अशा बॉलिवूड चित्रपटांमधूनही वैभवने कामं केली आहेत. बाजीराव मस्तानीमधील त्याच्या चिमाजी आप्पा या ऐतिहासिक भूमिकेचंही फार कौतुक झालं होतं. गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या लिपस्टिक अंडर माय बुरखामधील भूमिकाही गाजली. सध्या तो मणिकर्णिका- दि क्विन ऑफ झांसी या चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त असून या चित्रपटातही तो ऐतिहासिक भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे वैभवच्या या विविधांगी भूमिका पाहण्यासाठी त्याचे चाहतेही आतूर झाले आहेत.

 

दरम्यान, या वैभवच्या नव्या मराठी चित्रपटाचं चित्रिकरण पुढच्या महिन्यापासून मुंबई आणि दुबईत होणार असून चित्रपटाचं नाव गुपित ठेवण्यात आलंय.

बातम्या आणखी आहेत...