आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'सुर नवा ध्यास नवा\'मधून वैशाली भैसने-माडेची अचानक एक्झिट, हे आहे यामागचे कारण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राची महागायिका म्हणून ओळखली जाणारी वैशाली भैसने माडे हिने छोट्या पडद्यावर सुरु असलेल्या 'सूर नवा ध्यास नवा' या गाजत असलेल्या सांगितिक रिअॅलिटी शोमधून एक्झिट घेतली आहे. वैशालीने अचानक शोमधून एक्झिट घेत असल्याचे बुधवारी रात्री प्रक्षेपित झालेल्या कार्यक्रमात सांगितले. वैशाली अचानक शोमधून बाहेर पडत असल्याचे कळताच शोचे जज अवधुत गुप्ते, महेश काळे आणि शाल्मली खोलगडे यांच्यासह तमाम प्रेक्षकांना मोठा धक्का बसला. मनात इच्छा असूनदेखील शोमध्ये पुढे जाता येणार नसल्याचे वैशालीने सांगितले. 

 

काय आहे शोमधून एक्झिट घेण्याचे कारण? 

वैशाली भैसने माडे हे महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचलेले नाव. विविध शोजमधून वैशाली प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. सूर नवा ध्यास नवा या शोमध्येही तिने सर्व ताकदीच्या स्पर्धकांमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. पण आता यापुढे वैशाली प्रेक्षकांना या शोमध्ये दिसणार नाही. तिने अचानक या शोमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. कामाच्या कमिटमेंट्ससोबतच पी.एच.डी आणि एम. फिलच्या तयारीसाठी शो सोडत असल्याचे वैशालीने यावेळी सांगितले. एम. फिलची परीक्षा तोंडावर आली आहे, शिवाय कामाच्या कमिटमेंट्समुळे या शोसाठी आता यापुढे वेळ देता येणार नाही. इच्छा असूनदेखील आता शोमध्ये पुढे जाता येत नसल्याची खंत वाटत असल्याचे वैशालीने यावेळी सांगितले.  


अवधुत गुप्ते म्हणाले, स्वीट डिश मिस करणार...
जसं जेवणानंतर स्वीट डिश हवी असते. अगदी त्याप्रमाणे वैशालीचे गाणे आमच्यासाठी स्वीट डिश असते, अशा शब्दांत अवधुतने वैशालीचे कौतुक करत तुझे गाणे खूप मिस करु असे म्हटले. पण आगामी काळात पुन्हा शोमध्ये येण्यासाठी वेळ मिळाला तर नक्की सांग, मी वाहिनीशी बोलेण, असेही अवधूत यांनी वैशालीला सांगितले. एकंदरीतच शोच्या जजेससोबतच प्रेक्षकदेखील वैशालीचे गाणे मिस करणार हे नक्की. 

 

पुढील स्लाईड्सवर बघा, 'सूर नवा ध्यास नवा' या कार्यक्रमाच्या मंचावरची वैशालीची निवडक छायाचित्रे...

बातम्या आणखी आहेत...