आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या महागायिकेने शुन्यातून गाठले यशोशिखर, हलाखीच्या परिस्थितीत गेले होते बालपण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राची महागायिका म्हणून ओळखली जाणारी वैशाली भैसने माडे हिने छोट्या पडद्यावर सुरु असलेल्या 'सूर नवा ध्यास नवा' या गाजत असलेल्या सांगितिक रिअॅलिटी शोमधून एक्झिट घेतली आहे. कामाच्या कमिटमेंट्स, पीएचडी आणि एम फिलच्या अभ्यासासाठी वैशालीने अर्ध्यावर हा शो सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या शोमध्ये प्रेक्षक नक्कीच तिला मिस करणार, हे काही वेगळे सांगायला नको. आज या पॅकेजमधून जाणून घेऊयात, वैशालीच्या प्रवासाबद्दल... 


अतिशय हलाखीच्या परिस्थिती केला वैशालीने सामना...  
33 वर्षीय वैशालीचा जन्म 21 ऑगस्ट 1984 रोजी अमरावती जिल्ह्यातील खारतळेगाव येथे एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला. अतिशय खडतर प्रवासानंतर वैशालीने संगीत क्षेत्रात यश मिळवले आहे. लहानशा खेड्यात जन्मलेली, वाढलेली शेतकरी कुटुंबातील ही मुलगी. त्या गावात पंधरा-सोळा वर्षांपूर्वीपर्यंत डोक्यावर हंडे घेऊन बाहेरगावाहून पाणी आणावे लागयचे. शेती हाच मुख्य व्यवसाय होता. आपली शेती दुस-याला मक्त्याने देऊन मिळालेल्या पैशात संसार चालवायचा. दुपारचे जेवण मिळाले, तर रात्रीचे काय, अशा विवंचनेत जगत असलेले हे कुटुंब. अशा हलाखीच्या परिस्थिती वैशालीचे बालपण गेले.  

 

पुढे वाचा, नव-यासोबत गाठली मुंबई... 

बातम्या आणखी आहेत...