आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: माधुरीचा \'बकेट लिस्ट\' बघायला पोहोचले आलियापासून अनिल कपूरपर्यंत हे Celebs

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माधुरी दीक्षितचा पहिलावहिला मराठी चित्रपट 'बकेट लिस्ट' उद्या म्हणजेच 25 मे रोजी बॉक्स ऑफिसवर दाखल होतोय. चित्रपटाच्या रिलीजपूर्वी बॉलिवूडच्या कलाकारांसाठी बुधवारी मुंबईत चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. या स्क्रिनिंगला बॉलिवूडमधून अनेक सेलिब्रिटी पोहोचले होते. अभिनेता अनिल कपूर, आलिया भट, वरुण धवन, इशान खट्टर, जान्हवी     कपूर यांनी माधुरीचा पहिलावहिला मराठी चित्रपट बघितला. विशेष म्हणजे 'टोटल धमाल' या आगामी हिंदी चित्रपटात माधुरी अनिल कपूरसोबत काम करणार आहे. तर आगामी 'कलंक' या चित्रपटात आलिया आणि वरुणसह माधुरी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.  स्क्रिनिंगला या सर्वच सेलिब्रिटींसोबत माधुरीची स्पेशल बाँडिंग बघायला मिळाली. 

 

स्क्रिनिंगला माधुरीचे पती डॉ. श्रीराम नेने यांचीही विशेष उपस्थिती होती. याशिवाय सुमीत राघवन त्याची पत्नी चिन्मयी सुमीतसोबत पोहोचला होता. तर रेणुका शहाणे त्यांचे पती आशुतोष राणासोबत उपस्थित होत्या. 

 

पाहुयात, 'बकेट लिस्ट'च्या स्क्रिनिंगला पोहोचलेल्या सेलेब्सचे खास PHOTOS.... 

 

बातम्या आणखी आहेत...