आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
वरुण धवन आणि बनिता संधू स्टारर ‘अक्टूबर’ रिलीज होऊन आठवडा झाला. खरं तर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही. पण आता रिलीजच्या आठवड्याभरानंतर याच्यासंदर्भातील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
शूजीत सरकार दिग्दर्शित ‘अक्टूबर’ हा हिंदी चित्रपट एका मराठी चित्रपटाची हुबेहुब कॉपी असल्याचा दावा केला जात आहे. गेल्यावर्षी 18 ऑगस्टला ‘आरती : द अननोन लव्ह स्टोरी’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता. ‘अक्टूबर’ हा याच मराठी चित्रपटाची कॉपी असल्याचा दावा हेमल त्रिवेदी नावाच्या निर्माती आणि एडिटरने केला आहे. फेसबुकवर एक खळबळजनक पोस्ट लिहित हेमल यांनी शूजीत सरकार यांच्यावर मराठी चित्रपट चोरल्याचा आरोप केला आहे.
फेसबुक पोस्टमध्ये काय म्हणाल्या हेमल त्रिवेदी...
शूजीत सरकार यांनी सारिका मेने यांचा मराठी चित्रपट ‘आरती : द अननोन लव्ह स्टोरी’ची चोरी केली आहे. सारिकाचा हा चित्रपट तिचा भाऊ सनीच्या ख-या आयुष्यावर आधारित आहे. शूजीत सरकार यांनी चित्रपटाची कथाचं नाही तर त्यातील ओरिजनल सीन्स आणि लूकची तंतोतंत कॉपी केली. त्यांनी ना मराठी चित्रपटाचे हक्क मागितले ना. मूळ मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शिका सारिका यांच्याशी संपर्क साधण्याची तसदी घेतली,’असे हेमल त्रिवेदी यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.
शूजीत सरकार यांच्या या कृत्यामुळे सारिका तणावात आहे. इतकी की, ती सुसाइडल केस झाली आहे. गेल्या काही दिवसांत तिने देशाच्या अनेक संस्थांकडे गेली, अनेक लोकांकडे गेली. पण कुणीच तिची मदत केली नाही. न्याय मिळवण्यासाठी आत्तापर्यंत तिने 2 लाखांवर खर्च केलेत. सारिका एका मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. ‘आरती : द अननोन लव्ह स्टोरी’ हा चित्रपट साकारण्यासाठी तिने आपले वडिलोपार्जित घरही विकले. ‘आरती : द अननोन लव्ह स्टोरी’ची मूळ कथा, दृश्ये सगळे काही चोरले गेले. पण याविरोधात कायदेशीर कारवाईचा खर्च पेलण्यास सारिका असमर्थ आहे. मी स्वत: ‘आरती : द अननोन लव्ह स्टोरी’चा हिंदी रिमेक बनवणार होते. यासाठी मी ‘आरती : द अननोन लव्ह स्टोरी’चे 40 टक्के हक्क विकत घेतले होते. गाणी आणि स्क्रीनप्ले लिहिण्यावरही बराच खर्च केला होता. पण आमचा हिंदी रिमेक बनण्यापूर्वीच ‘अक्टूबर’ रिलीज झाला. आम्हाला न्याय हवाय. मी या लढाईत सारिकाच्या पाठीशी आहे, असेही त्या त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाल्या आहेत.
पुढील स्लाईड्सवर वाचा, हेमल त्रिवेदी यांची पोस्ट...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.