आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

#BBMarathi:विनीत भोंडेला सतत नियम मोडण्याबद्दल मिळाली शिक्षा! करायला लावले असे..

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - कलर्स मराठीवरील बिग बॉसच्या घरातील विनीत भोंडे हा बाराच वेळा चर्चेचा विषयी असतो. मग त्याचे जोरजोरात बोलणे असो वा त्याचे चिडणे असो. बिग बॉसच्या घरामध्ये नियमांना खूप महत्व असते. घरातील कुठलाही रहिवाशी बिग बॉसने दिलेल्या नियमांचे उल्लंघन करू शकत नाही, आणि असे केल्यास त्याला शिक्षा देण्यात येते. असेच काहीसे विनीत भोंडे बद्दल झाल्याचे दिसून येते. पहिल्या दिवसापासून विनीत भोंडेला त्याचा माईक विसरण्याची सवय आहे. ईतकेच नव्हे तर कॅप्टनसीच्या दरम्यान देखील त्याची ही सवय गेली नाही. याच कारणामुळे तो आता बिग बोसच्या शिक्षेस पात्र ठरणार आहे. विनीतच्या या बेफिकीर स्वभावावर घरतल्या इतर मंडळींनी देखील बऱ्याचदा आक्षेप घेतल्याचे दिसून आले आहे.

 
बिग बॉसच्या आदेशानुसार विनीत भोंडेला गार्डन एरियामध्ये बसून 'बिग बॉस मला माफ करा' असे त्याला पाटीवर लिहीहायचे आहे बिग बॉसचा पुढचा आदेश मिळे पर्यंत. विनीतच्या या स्वभावामुळे घराचा कॅप्टन आस्ताद काळेने त्याच्यावर नाराजगी व्यक्त केली. आपण त्याचे पालक नाही असे देखील तो म्हणाला.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, विनीत भोंडेचे इतर फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...