आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाग्यश्रीसोबत असा शूट झाला होता सलमान खानचा पहिला kiss सीन, दोघेही होते ओशाळलेले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सलमान खान नुकताच काळवीट शिकार प्रकरणातून जामिनावर तुरुंगातून सुटला आहे. हम साथ साथ है चित्रपटाच्या शूटिंगवेळी सलमानने दोन काळवीटांची शिकार केली होती. सलमान त्याच्या रिअल आणि रिल लाईफमध्ये नेहमीच चर्चेत असतो. सलमानने फिल्म इंडस्ट्रीत 29 वर्षे पूर्ण केली आहेत आणि या संपूर्ण फिल्मी करिअरदरम्यान सलमानने कधीही कोणत्याच चित्रपटात किसींग सीन दिले नाहीत. केवळ त्याच्या करिअरच्या अगदी सुरुवातीच्या काळात आलेला सुपरहिट चित्रपट मैने प्यार किया मध्ये सलमानने किसींग सीन दिला होता. हा सीन देण्यास सलमानची चित्रपटातील अभिनेत्री भाग्यश्रीने नकार दिला होता. जाणून घ्या काय घडले होते नेमके...

 

 सलमानही ओशाळला होता..
- सलमानने सांगितले, जेव्हा किस सीनची वेळ आली तेव्हा मला वाटले की हा सीन कसा शूट होईल. मी सूरजकडे गेलो आणि हा सीन करणे अनकम्फर्टेबल आहे असे सांगितले. यावर सूरज म्हटले तु केवळ अनकम्फर्टेबल आहेस पण भाग्यश्री हा सीन करण्यासच नकार देत आहे. 
- सलमानने सांगितले की, सूरजने मला सांगितले की, ही राजश्रीची लव्हस्टोरी आहे आणि यात केवळ एकच सीन आहे. पण भाग्यश्रीने हा सीन करण्यास साफ नकार दिला. 
- सूरज यांनी हा सीन शूट न करण्याचे ठरवले. मग शेवटचा पर्याय म्हणून दोघांमध्ये एक काच ठेवण्यात आली आणि हा सीन पूर्ण करण्यात आला.

 

तर या कारणासाठी किस सीन करण्यास सलमानचा असतो नकार..
- असे म्हणतात की, चित्रपटात येण्याअगोदरच सलमानने ठरवले होते तो कधीही किस सीन करणार नाही. चित्रपट हा संपूर्ण कुटुंबासोबत कोणत्याही अडचणीविना पाहता यावा असे त्याचे अगोदरपासून मत आहे.

- सलमानने आतापर्यंत 100 हून जास्त चित्रपट केले आहेत.स त्याचा शेवटचा रिलीज 'ट्यूबलाइट' होता. सध्या सलमान 'टाइगर जिंदा है' ची शूटिंग करत आहे. याशिवाय तो रेमो डिसूजा चा 'डांसिंग डैड' आणि आनंद एल. रायसोबत अनटाइटल्ड चित्रपटात काम करत आहे. 'रेस' फ्रेंचाइजीच्या तिसऱ्या पार्टमध्येही सलमान झळकु शकतो.

 

पुढच्या स्लाईडवर वाचा, पहिल्यांदा मैने प्यार किया पाहून झोपली होती सलमानची फॅमिली..

बातम्या आणखी आहेत...