आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Winner List : जाणून घ्या कोणकोणते सेलिब्रिटी ठरले झी चित्र गौरव पुरस्काराचे मानकरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 मराठी चित्रपटसृष्टीसाठी ऑस्कर समजला जाणारा मानाचा “झी चित्र गौरव” पुरस्कार 9 मार्च जाहीर झाले. सुमित राघवन आणि प्रसाद ओक यांच खुसखुशीत सूत्रसंचालन, उमेश कामत - स्पृहा जोशी, सिद्धार्थ जाधव - पर्ण पेठे, आदिनाथ कोठारे - प्राजक्ता माळी यांच्या डान्स परफॉर्मन्सने कार्यक्रमात बहार आणली.
 
अनेक दशके कलाक्षेत्रावर आपला ठसा उमटवणाऱ्या आशाताई काळे आणि मधू कांबीकर यंदाच्या जीवन गौरव पुरस्काराच्या मानकरी ठरल्या गेली. तसेच मराठी पाऊल पडते पुढे या पुरस्काराचे मानकरी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे दिग्दर्शक अमित मसुरकरठरले . 'हंपी' आणि 'कच्चा लिंबू' या चित्रपटांनी सर्वाधिक पुरस्कार मिळविले. सचिन खेडेकर यांना 'बापजन्म'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा तर सोनाली कुलकर्णी हिला 'कच्चा लिंबू'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. यावर्षीचा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला 'मुरंबा'. येत्या 25 मार्च रोजी संध्याकाळी 7  वाजता हा सोहळा झी मराठीवर प्रेक्षकांना बघता येणार आहे. 
 
एक नजर टाकुया झी चित्र गौरव पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या विजेत्यांवर... 
 
> सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - विजय निकम - (मला काहीच प्रॉब्लेम नाही)
> सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - ज्योती सुभाष - (चि. व चि. सौ. का.)
> सर्वोत्कृष्ट अभिनेता - सचिन खेडेकर - (बापजन्म)
> सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - सोनाली कुलकर्णी - (कच्चा लिंबू)
> सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन - नचिकेत सामंत - (गच्ची)
> सर्वोत्कृष्ट चित्रपट - मुरांबा
> सर्वोत्कृष्ट खलनायक - गिरीश कुलकर्णी - (फास्टर फेणे)
> परीक्षक पसंती पुरस्कार - रिंगण
> सर्वोत्कृष्ट बालकलाकार - साहिल जोशी - (रिंगण)
> परीक्षक पसंती पुरस्कार - दिग्दर्शन मंगेश जोशी - (लेथ जोशी)
> सर्वोत्कृष्ट वेशभूषा - विक्रम फडणीस डिझाईन टीम - (हृद्यांतर)
> सर्वोत्कृष्ट रंगभूषा - विद्याधर भट्टे - (कच्चा लिंबू)
> सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शन - संतोष फुटाणे - (कच्चा लिंबू)
> सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन - फुलवा खामकर - (हंपी Apne Hi Rang me)
> सर्वोत्कृष्ट संकलन - जयंत जठार - (कच्चा लिंबू)
> सर्वोत्कृष्ट छायाचित्रण - अमलेंदू चौधरी - (हंपी)
> सर्वोत्कृष्ट ध्वनीरेखाटन - अभिजीत केंडे - (भेटली तू पुन्हा) 
> सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत - नरेंद्र भिडे / आदित्य बेडेकर - (हंपी) 
> सर्वोत्कृष्ट गीतकार - वैभव जोशी - मुरांबा (Title song)
> सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका - रुपाली मोघे - मरुगेलारा ओ राघवा (हंपी)
> सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक - जसराज जोशी - मुरांबा शीर्षक गीत (मुरांबा)
> सर्वोत्कृष्ट संगीत - नरेंद्र भिडे / आदित्य बेडेकर - (हंपी)
> सर्वोत्कृष्ट कथा - वरुण नार्वेकर - मुरांबा
> सर्वोत्कृष्ट पटकथा - वरुण नार्वेकर - (मुरांबा)
> सर्वोत्कृष्ट संवाद - मधुगंधा कुलकर्णी - (चि. व चि. सौ. का.)
 
पुढील स्लाईड्सवर बघा, सोहळ्याची खास क्षणचित्रे...
 
 
बातम्या आणखी आहेत...