आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Womend Day Celebration On Set Of Marathi Serial Goth

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: 'गोठ'च्या सेटवर झालं, महिला दिनाचं सरप्राईज सेलिब्रेशन!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

छोट्या पडद्यावरील 'गोठ' या मालिकेत आणि मालिकेच्या सेटवर नेहमीच सगळे सण-उत्सव मोठ्या उत्साहानं साजरे होतात. मात्र, मालिकेतल्या अभिनेत्रींना महिलाचदिनाचं खास सरप्राईज मिळालं. सहकलाकारांकडून मिळालेल्या गिफ्ट्सनी सेटवर महिला दिन साजरा झाला.

 

गोठ मालिकेला अभय म्हापसेकर, अर्थात सुशील इनामदार आणि बरूण मौर्य यांनी सुप्रिया विनोद (कांचन), क्षमा देशपांडे (बायोआजी), रुपल नंद (राधा), सुरभी भावे(दीप्ती), शलाका पवार (सुलेखा) या सहअभिनेत्रींना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्याच; सोबतच गुलाब आणि चॉकलेट्सही दिली. या सरप्राईजनं या सर्वजणी खूप खुश झाल्या. महिला दिनाच्या या सेलिब्रेशनविषयी सुप्रिया विनोद यांनी आवर्जून फेसबुकवर पोस्टही लिहिली.

 

पोस्टमध्ये त्या म्हणतात, 'आमच्या 'गोठ'च्या सेटवर सगळे सणवार साजरे होतात.अगदी एरवी घरी कधी केले नसतील इतके साग्रसंगीत! पण काल (वुमन्स डेला) व्यक्तिरेखा म्हणून नाही, माणूस म्हणून - स्त्री म्हणून - कौतुक मिळालं अचानक ! सुशीलने लाल गुलाब दिले, वरुणने चॉकलेट्स! सगळीकडे 'हॅपी वुमन्स डे' लिहिलेलं स्त्री म्हणून आजवर मला काय मिळाले, काय नाही या खोलात मी शिरले नाही.... मजा वाटली न काय!’