आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Marathi cinema
  • World Family Day: Family Photos Of Marathi TV And Film Celebrities भेटा मराठी सेलेब्सच्या कुटुंबीयांना, असे घालवतात निवांत क्षण

World Family Day: भेटा मराठी सेलेब्सच्या कुटुंबीयांना, असे घालवतात निवांत क्षण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः आज वर्ल्ड फॅमिली डे आहे. दरवर्षी 15 मे रोजी हा दिवस साजरा केला जातो. 15 मे 1994 रोजी युनायटेड नेशन्समध्ये सर्वप्रथम जागतिक कुटुंब दिन साजरा करण्यात आला होता. तेव्हापासून दरवर्षी या दिवशी जगभर कुटुंबाचे महत्व साजरे करण्यात येते. या खास दिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला मराठी सेलिब्रिटींचे त्यांच्या कुटुंबीयांसोबतची खास छायाचित्रे दाखवत आहोत. 


खरं तर डेली सोप किंवा सिनेमांच्या शूटिंगमध्ये हिंदीप्रमाणेच मराठी सेलिब्रिटीसुद्धा खूप बिझी असतात. कामाच्या व्यापातून फार कमी वेळ त्यांना कुटुंबीयांसाठी मिळत असतो. मात्र कामाच्या व्यापातून फावला वेळ मिळाल्यास ते आपल्या कुटुंबीयांना प्राधान्य देताना दिसतात.


नेहमी प्रमोशनल इव्हेंटमध्ये सहभागी होतानाची मराठी सेलिब्रिटींची छायाचित्रे प्रेक्षकांना बघायला मिळत असतात. मात्र आपल्या कुटुंबीयांसोबतची त्यांची झलक क्वचितच बघायला मिळते. ही छायाचित्रे म्हणजे सेलिब्रिटींचे परफेक्ट फॅमिली क्लिक्स आहेत. या छायाचित्रांमध्ये काही सेलिब्रिटी आपल्या आईवडीलांसोबत तर काही जण पत्नी आणि मुलांसोबत दिसत आहेत.
सेलिब्रिटींची ही छायाचित्रे कदाचितच तुम्ही पाहिली असावीत. चला तर मग पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा सेलिब्रिटींचे फॅमिली क्लिक्स....

 

बातम्या आणखी आहेत...