आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Marathi cinema
  • World Music Day Meet 10 Young Marathi Playback Singers World Music Day : या आहेत M Town मधील नव्या पिढीच्या 10 प्लेबॅक सिंगर्स

World Music Day: या 10 मराठी गायिकांना आवाजासोबत मिळाली आहे सौंदर्याची देणगी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः आज 21 जून... हा दिवस वर्ल्ड म्युझिक डे म्हणून साजरा केला जातो. जगभरातील गायक आणि संगीतकारांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो. बॉलिवूडप्रमाणेच मराठी सिनेसृष्टीत एकापेक्षा एका सिंगर्स आहेत. त्यांनी आपल्या सुमधूर आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आणि करत आहे. मराठी इंडस्ट्रीतील आजच्या काळातील गायिका आपल्या आवाजासोबतच ग्लॅमरस अंदाजासाठीही ओळखल्या जातात. 


Divyamarathi.com तुम्हाला अशाच काही प्लेबॅक सिंगर्सविषयी सांगत आहोत. त्यांच्या आवाजासोबतच सौंदर्याने प्रेक्षकांना भूरळ घातली आहे.

 

बेला शेंडे 
बेला शेंडेने मराठीच नव्हे तर हिंदीतही आपल्या आवाजाची जादू दाखवली आहे. बेलाचा जन्म गायक घराण्यात झाला. आजी कुसुम शेंडे यांच्याकडून तिने गायनाचे धडे गिरवले. वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी सारेगमप या सांगितिक कार्यक्रमाची ती विजेती ठरली होती.  नटरंग, मुंबई पुणे मुंबई, बालगंधर्व, लग्न पाहावे करुन, इश्कवाला लव, मुंबई पुणे मुंबई 2, बाजी यांसह अनेक मराठी सिनेमांसाठी बेलाने गाणी गायली आहे. तर हिंदीत तिने जोधा अकबर, मोहनजोदारो, रज्जो, बेशरम, तेरा मेरा साथ रहे, वॉट्स युवर राशीसह अनेक नावाजलेल्या सिनेमांसाठी पार्श्वगायन केले आहे. जोधा अकबर या सिनेमातील मन मोहना या गाण्यासाठी बेलाला आयफा अवॉर्ड सोहळ्यात सर्वोत्कृष्ट पार्शवगायिकेसाठी नामांकन मिळाले होते. तर 2014 साली 'तुह्या धर्म कोनचा' या मराठी सिनेमातील 'खुरखुरा..' या गाण्यासाठी बेलाला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.  तामिल आणि तेलगू सिनेमांसाठीही बेला पार्श्वगायन करते.  

 

पुढे वाचा, बेलाची सख्खी बहीणसुद्धा आहे प्रसिद्ध गायिका आणि सोबतच भेटा मराठी इंडस्ट्रीतील आजच्या काळातील प्रसिद्ध गायिकांना...  

बातम्या आणखी आहेत...