आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेली अनेक दशके कलाक्षेत्रावर आपला ठसा उमटवणाऱ्या ‘आशाताई काळे’ आणि ‘मधू कांबीकर’ यांना. तब्येत ठीक नसल्याने मधू कांबीकर येऊ शकल्या नाहीत. त्यांच्या वतीने हा पुरस्कार त्यांच्या सुनेने स्वीकारला. पुरस्कार स्वीकारताना त्या खूप भावुक झाल्या. “एखाद्या उपग्रह वाहिनीवर त्यांची भूमिका असणारा शापित,एक होता विदूषक सारखा एखादा चित्रपट दाखवला जातो तेव्हा त्यासमोर त्यांना बसवले की, त्या काही रिऍक्ट होतात. कलेशी समर्पणाची भावना असणे म्हणजे काय असते हे मी त्यांच्या रूपाने पाहतेय”,असे म्हणताच त्यांना अश्रू अनावर झाले. या सोहळ्यातील हा अतिशय भावूक क्षण ठरला. डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. आशा काळेही आपला पुरस्कार स्वीकारताना भावनाविवश झाल्या.
सीमा देव यांच्या हस्ते त्यांना हा मानाचा पुरस्कार देण्यात आला. आशा काळे या वेळेस जुन्या आठवणीत रमल्या. त्या म्हणाल्या, कोल्हापुरात कॉलेजमध्ये असताना जयप्रभा स्टुडिओत आम्ही काही मैत्रिणी शूटिंग पाहायला गेलो होतो. वरदक्षिणा या चित्रपटाचे चित्रीकरण तेव्हा सुरु होते आणि सीमा ताईंना काही मुली घट्ट पकडतात, असे दृश्य होते. मला अचानकच ही संधी मिळाली होती, तेव्हा सीमा ताईंचा घट्ट पकडलेला हात आजही मी तसाच धरून आहे. त्यांच्यासोबत मी चित्रपटातून एकत्र काम करू शकले नाही पण नाटकातून मात्र आम्ही एकत्र काम केले, दौरे केले. माझे यश माझ्या एकटीच नसून माझे सगळेच निर्माता -दिग्दर्शक, सहकलाकार, तंत्रज्ञ असे या सगळ्यांचे आहे. त्या सर्वांचेच मी आज आभार मानते, असे ही आशा काळे म्हणाल्या. या वेळेस दोघींच्याही कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारी चित्रफीत दाखवण्यात आली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.