आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Trailer: \'फन्ने खां\'मध्ये दिसतेय मराठमोळ्या अभिनेत्याची झलक, पाहा हटके Look

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : डायरेक्टर अतुल मांजरेकरचा आगामी चित्रपट 'फन्ने खां' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. या चित्रपटा अनिक कपूर, ऐश्वर्या राय, राजकुमार राव असे दिग्गज कलाकार काम करताना दिसत आहेत. यांच्यासोबतच मराठी चित्रपटसृष्टीतील मोठं नाव असलेला गिरीश कुलकर्णीही या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात गिरीशचा हटके अंदाज पाहायला मिळतोय या संपुर्ण ट्रेलरमध्ये ऐश्वर्या रायसोबत वावरताना दिसतोय. चित्रपटातून त्याचा एक वेगळाच लूक आपल्याला पाहायला मिळतोय. 

 

दिसतोय स्टायलिश लूक
हा चित्रपट गिरीशसाठी महत्त्वाचा आहे. कारण यामध्ये त्याचा गिरीशचा स्टायलिश लूक पाहायला मिळतोय. यामध्ये त्याने डोळ्यांमध्ये लेन्सचा वापर केलेला दिसतोय. त्याचा लूकही नेहमीपेक्षा वेगळा आहे. आपण यापुर्वी कधीही त्याला या लूकमध्ये पाहिलेले नाही. यामुळे तो लक्षवेधी ठरतोय. 

 

यापुर्वी या बॉलिवूड चित्रपटांमध्ये झळकला 
हा मराठमोळा चेहरा पहिल्यांदाच बॉलिवूडमध्ये दिसतोय असे नाही. यापुर्वीही तो हिंदू चित्रपटात झळकला आहे. आमिर खान फेम 'दंगल' आणि हृतिक रोशन आणि यामी गौतमच्या 'काबिल' मधून तो बॉलिवूड चित्रपटांमध्ये झळकला होता. 'दंगल' मध्ये त्याने कोचची भूमिका साकारली होती. तर 'काबिल'मध्ये तो पोलिस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत दिसला होता. आता त्याचा आगळावेगळा अंदाज पाहायला मिळतोय.

 

3 ऑगस्टला रिलीज होणार चित्रपट
- हा चित्रपट 3 ऑगस्टला चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. 73 व्या अकॅडमी अवॉर्ड्समध्ये नामांकन मिळवलेल्या 'एव्हरीबडीज फेमस' या बेल्जियन चित्रपटाचा फन्ने खान रिमेक आहे. राकेश ओमप्रकाश मेहरा निर्मित या चित्रपटाचं दिग्दर्शन अतुल मांजरेकरनं केलं आहे. 

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा फोटो, शेवटच्या स्लाइडवर पाहा चित्रपटाचा ट्रेलर...

 

बातम्या आणखी आहेत...