आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Marathi cinema
  • Bigg Boss Marathi Day 71 Highlights #BBMDay71: “होउ दे चर्चा” या टास्कसाठी पुष्करने घातली बिकिनी, आज करणार चक्क Waxing

#BBMDay71: “होउ दे चर्चा” या टास्कसाठी पुष्करने घातली बिकिनी, आज करणार चक्क Waxing

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये  काल रंगले दोन टास्क. सदस्यांना बिग बॉस मराठीच्या घरामध्ये येऊन आता 70 दिवस झाले. याच अंदाजाचा आणि कल्पकतेचा आधार घेऊन स्वत:ची क्रमवारी सदस्यांना ठरवायची होती. सदस्यांच्या चांगल्या कृत्याची बाहेरच्या जगात दखल घेतली गेली असेल किंवा एखाद्या कृत्याची सनसनाटी बातमी झाली असेलच. तर सदस्यांना त्यांच्यापैकी अश्या पाच सदस्यांची क्रमवारी ठरवायची होती. यानुसार रेशम पहिल्या क्रमांकावर, मेघा, पुष्कर, सई आणि अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर उभे राहिले. 


नंतर रंगला 'होउ दे चर्चा' टास्क.. 
बिग बॉस यांनी घरातील सदस्यांना जरा हटके असे “होउ दे चर्चा” हे साप्ताहिक कार्य सोपवले. पहिल्याच दिवशी पुष्करने चक्का बिकिनी घालून घरात एकच धम्माल उडवून दिली आणि अर्थात तो ब्रेकिंग न्यूजमध्ये झळकला. आस्तादने आपल्या डोक्यात चीप बसवण्यात आली असून त्याद्वारे आपण मंगळावरील लोकांशी 'मार्शियन' भाषेत आपण संवाद साधतो, असं सांगत खळबळ उडवली. तर आऊ आणि शर्मिष्ठाने मोठे भांडण झाल्याचे दाखवले. जगावेगळं काहीतरी करत सदस्यांना आठवडाभर बातम्यांमध्ये यायचे आहे. पहिल्या दिवशी आधीच्या नॉमिनेशनच्या टास्कमध्ये अव्वल आलेल्या रेशम आणि मेघा हिला या 'होऊ दे चर्चा' टास्कमधील रिपोर्टर आणि कॅमेरामन बनवण्यात आले आहे.  जे या बिग बॉस न्यूज बुलेटिनच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये अव्वल येतील ते प्रत्येक वेळी रिपोर्टर आणि कॅमेरामनची भूमिका बजावणार आहेत. 


आज पुष्कर-आस्ताद होती रिपोर्टर आणि कॅमेरापर्सन...  
आज पुष्कर रिपोर्टर आणि आस्ताद कॅमेरापर्सन बनणार आहे..  “होउ दे चर्चा” या टास्कमध्ये आज सई आणि स्मिता, नंदकिशोर, पुष्कर आणि नंदकिशोर हे ब्रेकिंग न्यूज देण्याचा प्रयत्न करणार आहेत. सईचे फोटो कोणीतरी लपवले असल्याने ती आस्ताद, स्मिता यांना विचारणार आहे. ज्यावरून सई आणि स्मिताचे खूप भांडण होणार आहे. तसेच सई नंदकिशोर यांच्या डोक्यावर पीठ टाकणार आहे तसेच मेघा नंदकिशोर यांच्या डोक्यावर अंड फोडणार आहे. सईचे असे म्हणणे असणार आहे की, “जे काही तुम्ही घरात आल्यापासून वागलात आणि बोलात तसेच तुम्ही टास्कमध्ये माणुसकी सोडून वागलात ते मला आवडलेले नाही...  आणि तुम्ही ते मान्य देखील नाही त्यामुळे मी हे सगळे केले”. 


पुष्कर करणार वॅक्सिंग... 
पुष्कर जोग या टास्क साठी waxing करणार आहे. त्याचे म्हणणे असे असणार आहे की, “मला स्त्रियांबद्दल प्रचंड आदर आहे त्यांना ज्या वेदना होता किंबहुना सगळ्या वेदना त्यांच्याच नशिबी आल्या आहेत त्यामुळे त्यांना ज्या या वेदना होतात त्याला आज मी एकप्रकारे tribute देणार आहे माझ्या पायावरचे केस Wax करून”.


कोण ठरणार कॅप्टन... 
“होउ दे चर्चा” या साप्ताहिक कार्यामध्ये जो जास्तीत जास्तीत ब्रेकिंग न्यूज देणार आहे त्या सदस्यांना या आठवड्याच्या कॅप्टनसीसाठी उमेदवारी मिळणार आहे. त्यामुळे हे बघणे रंजक असणार आहे कोणाला मिळेल ही सुवर्णसंधी.  

 

पुढील स्लाईड्सवर बघा, बिग बॉसच्या आजच्या एपिसोडची निवडक छायाचित्रे...

 

बातम्या आणखी आहेत...