आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Telly World : कुंकू, टिकली आणि टॅटूमध्ये ट्विस्ट, रमा देणार वटपौर्णिमेची पूजा करण्यास नकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कलर्स मराठीवरील कुंकू, टिकली आणि टॅटू या मालिकेत वटपौर्णिमा साजरी होणार आहे. विभा, सुभद्रा, कामिनी यांच्यासोबत रमाची बहीण देखील येणार वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी सहभागी होणार आहे. परंतु रमा तिथे पूजा करण्यासाठी आली नाही हे बघून तिला आश्चर्य वाटणार आहे. सात जन्म हाच नवरा मिळो म्हणून पत्नी ही पूजा करते. वडाच्या झाडाला दोऱ्याचे वेष्टन देऊन दिवसभर उपवास व्रत आचरून सती – सावित्रीचे हे व्रत मोठ्या भक्तीभावाने पार पाडले जाते. मालिकेमध्ये सुभद्रा, विभा, कामिनी छान नटून, साड्या नेसून वटपौर्णिमाची पूजा करण्यास जाणार आहेत. परंतु रमाने मात्र हे व्रत ठेवण्यास नकार दिला आहे. आता रमाचा यावर  नकार का आहे ? विभाचे यावर काय म्हणणे असणार आहे. हे प्रेक्षकांना लवकरच कळेल.  

 

बातम्या आणखी आहेत...