आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

“सूर नवा ध्यास नवा”च्या मंचावर स्पर्धकांना मिळाले आशुतोष गोवारीकर यांच्याकडून एक खास सरप्राईझ !

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई-  सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमाच्या मंचावर दर आठवड्याला स्पर्धकांच्या मार्गदर्शनासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष अतिथी येतात. या आठवड्यामध्ये मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील विख्यात दिग्दर्शक, निर्माते आशुतोष गोवारीकर आले होते.

 

कार्यक्रमामधील गायकांनी विविध शैलींमधील गाणी उत्तम पद्धतीने सादर करून आशुतोष गोवारीकर आणि कॅप्टन्‍सचे मन जिंकले. कार्यक्रमादरम्यान स्पर्धकांची एका पेक्षा एक सरस गाणी सादर होत असताना आशुतोष यांनी स्पर्धकांना बरेच मोलाचे सल्ले दिले आणि त्यांना प्रोत्साहनदेखील दिले. सूर नवा ध्यासचा हा विशेष भाग सुरु असतानाच स्पर्धकांना आशुतोष गोवारीकर यांनी एक सरप्राईझ दिले. ज्यामुळे हा भाग अजूनच विशेष बनला. इतक्या मोठ्या माणसाकडून हे सरप्राईझ मिळणे म्हणजे स्पर्धकांना मिळालेली शाबासकीच असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

 

या विशेष भागाची सुरुवात झाली आशुतोष गोवारीकर यांच्याच चित्रपटातील 'या रे या सारे या' या गाण्याने. त्यानंतर श्रीनिधी, मधुरा कुंभार, शरयू दाते, प्रेसेनजीत कोसंबी, यांनी एका पेक्षा एक सरस गाणी म्हंटली. आशुतोष यांची काही आवडती गाणी देखील स्पर्धकांनी सादर केली. याच दरम्यान आशुतोष गोवारीकर यांनी लगान तसेच स्वदेस चित्रपटा दरम्यानच्या काही आठवणी देखील सांगितल्या. स्पर्धकांची गाणी ऐकून आशुतोषजींनी जाहीर केले जो कोणी सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाचा विजेता किंवा विजेती असेल त्याला त्यांच्या चित्रपटासाठी गाणं गाण्याची सुवर्णसंधी मिळेल. हे कळल्यानंतर सगळ्याच स्पर्धकांना खूप आनंद झाला.

 

बातम्या आणखी आहेत...