आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Never Seen Before: दिलीप साहेब, अशोक सराफ, महेश कोठारेंसोबत लक्ष्या, बघा 27 दुर्मिळ फोटोज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लक्ष्मीकांत बेर्डे हे केवळ एक अभिनेता नसून ती एक जादू होती. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत रसिक प्रेक्षकांना निखळ हास्याचे असंख्य क्षण देणार्‍या या हरहुन्नरी कलाकाराला कधी कोणी विसरू शकेल का? आज प्रेक्षकांच्या या लाडक्या अभिनेत्याचा वाढदिवस. 26 ऑक्टोबर 1954 रोजी जन्मलेले लक्ष्मीकांत आता या जगात असते तर त्यांनी वयाची 63 वर्षे पूर्ण केली असती. 
लक्ष्मीकांत बेर्डे या नावाने मराठी सिनेसृष्टीत दीड ते दोन दशके अक्षरश: धूमाकुळ घातला.
 
विनोदाचे अत्यंत अचुक टायमिंग असणा-या या अभिनेत्याने 16 डिसेंबर 2004 रोजी या जगाचा कायमचा निरोप घेतला. मूत्रपिंडाचा विकाराने वयाच्या 50व्या वर्षी लक्ष्मीकांत बेर्डेंचे निधन झाले होते. या हास्यसम्राटाला जाऊन 13 वर्षांचा काळ लोटला. मात्र आपल्या कलाकृतींच्या माध्यमातून सर्वांचा लाडका 'लक्षा' आजही आपल्यातच आहे. 
 
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला लक्ष्मीकांत बेर्डेंची अतिशय दुर्मिळ छायाचित्रे दाखवत आहोत. अगदी 'झपाटेलला' या सिनेमाच्या शूटिंगपासून ते दिलीप साहेब, अशोक सराफ, निळू फुले, अक्षय कुमार, अनिल कपूर, सचिन पिळगांवकर यांच्यासोबतच्या छायाचित्रांचा समावेश यामध्ये आहे.
 
पुढील स्लाईड्समध्ये पाहा लक्ष्मीकांत बेर्डेंची आठवणीतील छायाचित्रे...  
बातम्या आणखी आहेत...