आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्येचा अभिनय करताना मृत्यूमुखी पडला मराठी अभिनेता, हजारो लोकांसमोर तडफडून गेला जीव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - शहरात एका शोभायात्रेदरम्यान आत्महत्येचा अभिनय करताना एका मराठी अभिनेत्याचा मृत्यू झाला आहे. या कार्यक्रमावेळी तो अभिनेता आत्महत्या करणाऱ्या शेतकरीचा अभिनय करत होता. अचानक त्याच्या गळ्याला फास लागला आणि त्याचा तरफडून मृत्यू झाला. लोकांना वाटले अभिनय करतोय..
 
नागपूर पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार, शनिवारी जिल्ह्यातील रामटेक बैकुंठ चतुर्दशीनिमित्त एक शोभा यात्रा काढण्यात आली होती. या यात्रेत आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची व्यथा मांडण्यासाठी एक लहानसा देखावा ठेवण्यात आला होता. त्यात या अभिनेत्याला शेतकऱ्याचा अभिनय करायचा होता. 
 
नागपूरचा 27 वर्षाचा अभिनेता मनोज धुर्वे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या वेशात होता. त्याने दोरी त्याच्या गळ्यात टाकली. त्याच्यानंतर ट्रॅक्टरला लागलेल्या झटक्याने ती दोरी त्याच्या गळ्यात आवळली गेली. काहीच वेळात त्याला श्वास घेणे जड होऊ लागले आणि तो त्याचे हात-पाय झटकू लागला. बघणाऱ्याला तो अभिनय करत आहे असेच वाटले त्यामुळे त्याला कोणीच वाचवायला आले नाही. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, शोभायात्रा झाल्यानंतर काहीजण त्याच्याकडे पोहोचले पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. त्याला त्वरीत हॉस्पीटलमध्ये पाठवण्यात आले तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मनोजच्या मित्रांनी सांगितले की तो मुख्य कलाकार नव्हता पण शोभायात्रामध्ये अभिनय करण्यासाठी तो नेहमीच भाग घेत असे.
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, घटनास्थळाचे काही खास PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...