आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

GOOD NEWS : प्रसिद्ध गायक आदर्श शिंदेला कन्यारत्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्नी नेहासोबत आदर्श शिंदे - Divya Marathi
पत्नी नेहासोबत आदर्श शिंदे

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायक आदर्श शिंदेच्या चाहत्यांसाठी एक गोड बातमी आहे. आदर्श शिंदे आणि त्याची पत्नी नेहा लेले यांना कन्यारत्नाचा लाभ झालाय. नेहासुद्धा गायिका आहे. आदर्शचे वडील आनंद शिंदे हे प्रसिद्ध गायक आहेत. आदर्शचा भाऊ उत्कर्ष शिंदे याने सोशल मीडियाच्या माध्यमातू ही गोड बातमी चाहत्यांना दिली. उत्कर्षने फेसबुकवर आनंद व्यक्त करताना लिहिले, ''आपल्या घरी छोटीशी परी आली आहे. आदर्श आणि नेहाने शिंदे घराण्याला दिली नवी उर्जा.''
आदर्श आणि नेहा यांचा गेल्यावर्षी मे महिन्यात विवाह झाला होता. यांच्या लग्नाला अनेक कलाकार आणि दिग्गज मंडळी उपस्थित होते. त्यांच्या लग्नाच्या वरातीचे वैशिष्ट्य म्हणजे नवरा-नवरी एकाच बग्गीत बसले होते. लग्न बौध्द पध्दतीने लागले. लग्नात आदर्श-नेहाच्या या ‘प्यारवाल्या लव्हस्टोरी’ला शुभेच्छा द्यायला पोहोचल्या सेलिब्रिटीजमध्ये दिग्दर्शक संजय जाधव, अभिनेता स्वप्नील जोशी आणि अभिनेत्री सई ताम्हणकर ही 'दुनियादारी'ची टीम उपस्थित होती.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, आदर्श-नेहाच्या लग्नाची निवडक छायाचित्रे..