Home »Bollywood »Marathi Cinekatta» Aadesh Bandekars Home Minister Completes 13 Years Marathi Celebs In Home Minister

'होम मिनिस्टर'ची 13 वर्षे: कधी प्रमोशन-कधी सणांच्या निमित्ताने सेलिब्रिटी रमले पैठणीच्या खेळात

दिव्य मराठी वेब टीम | Sep 13, 2017, 13:53 PM IST

एंटरटेन्मेंट डेस्कः महाराष्ट्रातील तमाम वहिनींचा अतिशय जवळचा एक मराठी कार्यक्रम म्हणजे होम मिनिस्टर. आदेश भावोजी अर्थातच अभिनेते आदेश बांदेकरांसोबत पैठणीचा खेळात सहभागी होण्याची प्रत्येक महिलेचे स्वप्न आहे. प्रेक्षकांच्या लाडक्या कार्यक्रमाला आज यशस्वी 13 वर्षे पूर्ण झाली आहेत.
13 सप्टेंबर 2004 रोजी या कार्यक्रमाचा पहिला भाग झी मराठी वाहिनीवर प्रसारित झाला आणि तेव्हापासून सुरु झालेला हा प्रवास आजही अखंड सुरु आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदेश बांदेकरांनी दोन लाखांहून अधिक किलोमीटरचा प्रवास करुन वहिनींची सुखदुःख जाणून घेतली आणि त्यांच्या चेह-यावर हास्य फुलवले. अनेक तुटलेली नाती या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा जोडली गेली.
सामान्यांप्रमाणेच मराठी सेलिब्रिटीसुद्धा या कार्यक्रमाचा आवर्जुन भाग बनले. कधी मालिका-चित्रपटाच्या निमित्ताने तर कधी एखाद्या सणाच्या निमित्ताने अनेक मराठी कलाकार पैठणीच्या खेळात सहभागी झाले आणि कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला.
किशोरी शहाणे-वीज, निर्मिती सावंत, क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे आणि त्याची पत्नी, वैभव तत्त्ववादी, शशांक केतकर, सायली संजीव, ऋषी सक्सेना, देवदत्त नागे, इशा केसकर, सुरभी हांडे, कौशल इनामदार यांच्यासह अनेक सेलिब्रिटी या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत.
आज होम मिनिस्टरला 13 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पाहुयात, या कार्यक्रमाच्या मागील काही भागांत सहभागी झालेल्या मराठी सेलिब्रिटींची आदेश भावोजींसोबतची खास छायाचित्रे...

Next Article

Recommended