आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबुकवरुन सुरु झाली अभिजीतची Love Story, \'बाजीराव मस्तानी\'मध्ये झळकली पत्नी सुखदा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः  'माझ्या नव-याची बायको' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेला गॅरी अर्थातच अभिनेता अभिजीत खांडकेकर हा टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील आघाडीचा नायक आहे. 'माझिया प्रियाला प्रीत कळेना' ही अभिजीतची पहिली मालिका. खरं तर याच मालिकेतून तो तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला. छोट्या पडद्यासोबतच अभिजीत मोठ्या पडद्यावरही कार्यरत आहे. 'जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा', 'ध्यानीमनी', 'भय', 'ढोल ताशे' या चित्रपटांमध्ये तो झळकला आहे. हा आहे 'राधिका'चा ख-या आयुष्यातील 'गुरुनाथ', लग्नापूर्वी दीड वर्षे राहिले लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये
 
अभिजीतच्या खासगी आयुष्याविषयी सांगायचे म्हणजे तो मुळचा नाशिकचा असून त्याच्याप्रमाणेच त्याची बायकोदेखील अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. अभिनेत्री सुखदा देशपांडे-खांडकेकर हे अभिजीतच्या पत्नीचे नाव आहे. विशेष म्हणज आज सुखदाचा अनान हा मराठी चित्रपट रिलीज झाला आहे. प्रार्थना बेहरेसोबत सुखदाची या चित्रपटात महत्त्त्वाची भूमिका आहे. आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला सांगतोय, अभिजीत आणि सुखदाची लव्ह स्टोरी...
 
1 फेब्रुवारी 2013 रोजी हे दोघे विवाहबद्ध झाले. या दोघांची लव्हस्टोरी अतिशय इंट्रेस्टिंग आहे. फेसबुकवरुन दोघांच्या लव्ह स्टोरीला सुरुवात झाली होती. 

अशी सुरु झाली लव्ह स्टोरी... 
सुखदा आणि अभिजीत हे दोघेही मुळचे नाशिकचे आहेत. सुखदाच्या डान्सच्या आणि अभिजीतच्या नाटकातील एका कॉमन फ्रेंडमुळे हे दोघे एकमेकांना ओळखत होते. पण दोघांत बोलणे कधीच झाले नव्हते. त्याकाळात अभिजीत माझिया प्रियाला प्रीत कळेना ही मालिका करत होते. या मालिकेतील अभिजीतच्या कामाचे कौतुक सुखदाने फेसबुकच्या माध्यमातून केले होते.माझ्या घरातील सगळेच तुझी मालिका बघतात आणि नाशिकचा मुलगा मालिकेत एवढे चांगले काम करतोय, हे कौतुकच, अशा शब्दांत सुखदाने अभिजीतचे कौतुक केले होते. अशाप्रकारे फेसबुकच्या माध्यमातून अभिजीत आणि सुखदाची मैत्री झाली होती.

अभिजीतने घातली सुखदाला लग्नाची मागणी...
फेसबुकवरुन झालेल्या मैत्रीचे रुपांतर काही काळाने प्रेमात झाले. अभिजीतनेच पुढाकार घेत सुखदाला लग्नाची मागणी घातली. आपण एकमेकांचा विचार करायला काही हरकत नाही, असे अभिजीत तिला म्हणाला होता. सुखदानेही अभिजीतचे प्रपोज स्वीकारले आणि 1 फेब्रुवारी 2013 रोजी हे दोघे लग्नाच्या बेडीत अडकले. नाशिकमध्ये धुमधडाक्यात दोघांचे लग्न झाले. 

'बाजीराव मस्तानी'मध्ये झळकली आहे सुखदा... 
सुखदा एक ट्रेंड कथ्थक नृत्यांगणा आहे. तिने अमोल कोल्हेंसोबत 'हीच तर प्रेमाची गंमत आहे' या नाटकांत अभिनय केला. शिवाय 'धरा की कहानी' या हिंदी मालिकेत तिने काम केले. सुखदाचा 'अनसेन्सॉर्ड' ही यूट्युबवरील चॅट शो लोकप्रिय आहे. विशेष म्हणजे संजय लीला भन्साळी यांच्या सुपरहिट 'बाजीराव मस्तानी' या चित्रपटात काम करण्याची संधी सुखदाला मिळाली. बाजीरावांची बहीण अनूबाईची भूमिका सुखदाने या चित्रपटात वठवली होती. 
 
पुढील स्लाईड्सवर बघा, अभिजीत-सुखदाची रोमँटिक केमिस्ट्री दाखवणारे खास PHOTOS...
 
बातम्या आणखी आहेत...