आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'माझ्या नव-याची बायको' फेम अभिजीतसाठी का खास असतो Valentine's Day, जाणून घ्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रेमी युगुलांसाठी महत्वाचा असलेला दिवस म्हणजे 14 फेब्रुवारी. आपल्याला आवडणारी कलाकार मंडळी ‘व्हॅलेंटाइन डे’ च्या दिवशी काय करतात? हा दिवस कसा साजरा करणार? असे अनेक प्रश्न कलाकरांच्या चाहत्यांमध्ये निर्माण होतात. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारा आणि सध्या  'माझ्या नव-याची बायको' या मालिकेतून गॅरी म्हणून आपल्या भेटीला येणारा अभिनेता अभिजीत खांडकेकरच्या चाहत्यांसाठीही त्याच्या ‘व्हॅलेंटाइन डे’ विषयी कुतूहल नक्कीच असेल. अभिजीतला या दिवसाविषयी काय वाटते? यंदाचा व्हॅलेंटाइन तो कसा साजरा करणार? हे आम्ही त्याच्याकडूनच जाणून घेतलं. 
 
व्हॅलेंटाइन डे विषयी तुझं काय मत आहे?
- सध्या चांगुलपणा हरवत चालला आहे. ‘व्हॅलेंटाइन डे’च्या निमित्ताने सर्वांशी आपुलकी व प्रेमाने वागत प्रेमाचा, आपलेपणाचा गोड संदेश आपण सगळ्यांना द्यायला हवा असं मला वाटतं. हा दिवस फक्त कपल्सनेच सेलिब्रेट करावा असं नाही तर प्रत्येक नात्यामधला प्रेमाचा गोडवा वाढावा यासाठी या दिवसाचं औचित्य साधायला हवं.

पुढे वाचा,व्हॅलेंटाइन वीक साजरा करतो अभिजीत आणि बरंच काही... 
बातम्या आणखी आहेत...