आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्षाबंधन 2017 : 15 चुलत भावंडांची एकुलती एक बहीण आहे लक्ष्मीकांत बेर्डेंची मुलगी स्वानंदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठी इंडस्ट्रीतील सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा मुलगा अभिनयचे यावर्षी मोठ्या पडद्यावर दमदार पदार्पण झाले आहे. त्याची मुख्य भूमिका असलेला 'ती सध्या काय करते' हा चित्रपट खूप गाजला. अभिनय त्याच्या आईवडिलांचा अभिनयाचा वारसा पुढे नेतोय. लक्ष्मीकांत आणि प्रिया बेर्डे यांची एक मुलगीसुद्धा आहे. स्वानंदी बेर्डे हे तिचे नाव आहे. स्वानंदी आता 16 वर्षांची आहे. लक्ष्मीकांत बेर्डे यांचे निधन झाले तेव्हा अभिनय सात वर्षांचा तर स्वानंदी फक्त चार वर्षांची होती. त्यांच्या पश्च्यात अभिनय स्वानंदीसाठी वडिलांची भूमिका निभावतोय. खास रक्षाबंधनाचे औचित्य साधत अभिनयने स्वानंदीविषयीच्या काही खास गोष्टी divyamarathi.com सोबत शेअर केल्या आहेत.
 
अभिनय सांगतो, "यावर्षी मी कामात बिझी असल्याने रक्षाबंधनाचे खूप मोठे सेलिब्रेशन करणे आम्हाला जमणार नाहीये. पण सकाळी राखी बांधून मी घराबाहेर पडणार आहे. यावर्षी स्वानंदीला खूप मोठ्या गिफ्टची माझ्याकडून अपेक्षा आहे आणि तिच्यासाठी खास गोष्ट मी प्लान केली आहे. शंभर टक्के स्वानंदीला एक मोठे गिफ्ट माझ्याकडून मिळणार आहे."
 
स्वानंदी अभिनयची धाकटी बहीण आहे. त्यामुळे घरात सगळ्यांची ती लाडकी असल्याचे अभिनय सांगतो. तो म्हणतो, "स्वानंदी घरात लहान आहे. त्यामुळे ती आमच्या सगळ्यांची अतिशय लाडकी आहे. हवं ते करण्याची मुभा तिला आमच्याकडून देण्यात आली आहे. ती तिला हवे ते एक्सपिरिमेंट्स करु शकते. ती अतिशय महत्त्वकांक्षी आहे. आयुष्यात खूप काही करायची तिची इच्छा आहे. तिला जग फिरायचंय आहे. आयुष्यात जे काही ठरवले ते ती 100 टक्के पूर्ण करणार ही मला आशा आहे. मी कदाचित एखाद्या गोष्टीत अडकून पडू शकतो, पण ती स्वतःला कधीच एका चौकटीत बांधू ठेवणार नाही."  
 
अभिनय पुढे म्हणतो, "स्वानंदीला जेव्हा माझी गरज असते, तेव्हा मी तिच्या पाठिशी उभा असतो. सोशली कसं राहावं हे मी तिला सांगत असतो. माझं कॉलेज पूर्ण झालंय, त्यामुळे कॉलेजमधील अनुभव मी तिच्यासोबत शेअर करत असतो. कॉलेजमध्ये कसं राहावं, लोकांमध्ये कसं वागावं, या सगळ्यांची शिकवण माझ्याकडून तिला मिळत असते."
 
बालपणीच्या खोडकर आठवणींना उजाळा देताना अभिनय म्हणाला, "आमच्या दोघांच्या बालपणीच्या खोडकर आठवणी तशा खूप आहेत. पण स्वानंदीची रक्षाबंधनाच्या दिवशीची एक आठवण म्हणजे, आमच्या बेर्डे कुटुंबात आम्ही एकुण 15 चुलत भावंड आहोत. आमच्यात स्वानंदी ही एकच मुलगी आहे. बाकी सगळी मुलं आहेत. स्वानंदी तीन किंवा चार वर्षांची होती. आम्हा 15 भावंडाना तिला ओवाळायचे होते. पण तीन जणांना ओवाळल्यानंतर ती थकून गेली. माझा हात दुखतोय म्हणून रडायला लागली. मी तिचा हात पकडून सगळ्यांना ओवाळलं, अगदी रडत-रडत तिने सगळ्यांना ओवाळलं होतं. आजही त्या दिवसाची आठवण रक्षाबंधनाच्या दिवशी आवर्जुन आम्हाला होत असते." 

पुढे अभिनय हसून सांगतो, "दर रक्षाबंधनाला स्वानंदीकडून काहीतरी चुक होतेच. कधी ती ताटात निरांजन उलट्या दिशेला ठेवते तर कधी डाव्या हाताने टिका लावते. मग आम्ही सगळे भाऊ तिची टिंगल करत असतो. 16 वर्षांची झाली, अजून तुला काही जमत नाही,  असे म्हणून आम्ही भावंड तिला चिडवत असतो. ती एक वेगळीच मजा असते." 
 
रक्षाबंधन म्हणजे स्वानंदीसाठी लॉटरी असते. पंधरा भावांकडून तिला वेगवेगळे 15 गिफ्ट्स मिळतात. राखी पौर्णिमा आणि भाऊबीजेला तिची मोठी कमाई होते, असेही अभिनयने सांगितले.   
पाहुयात, अभिनय आणि स्वानंदीची निवडक छायाचित्रे... 
 

सेलिब्रिटी रक्षाबंधन स्पेशल... 
>> रक्षाबंधन 2017 : सोबत नसलो तरी गिफ्ट्स न चुकता पाठवतो भाऊ, सांगतेय मुक्ता
>> रक्षाबंधन 2017 : यंदा गश्मीर रक्षाबंधनाला सोबत नाही, तरी बहीण म्हणतेय ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही!’
>> रक्षाबंधन 2017 : दोन भावांची लाडकी बहीण आहे सोनाली कुलकर्णी, सांगतेय कसे असते सेलिब्रेशन
>> रक्षाबंधन 2017 : 'पुढचं पाऊल' फेम स्वप्नालीला नाहीये सख्खा भाऊ, बालपणी बहिणीलाच बांधायची राखी 
>>  रक्षाबंधन 2017 : रक्षाबंधन 2017 : निर्मिती-कमलेशचे हे रेशमी बंध, 'जाडूबाई जोरात'च्या सेटवर जाऊन दिले सरप्राइज 
बातम्या आणखी आहेत...