Home »Bollywood »Marathi Cinekatta» Abhinay Berde Shares GudiPadwa Memories

सेलिब्रिटींचा गुढीपाडवा : 'घरात गुढी उभारण्याची जबाबदारी आईने दिली माझ्याकडे'

समीर परांजपे | Mar 24, 2017, 00:10 AM IST

मराठी चित्रपटसृष्टी ज्यांनी आपल्या विनोदी अभिनयाने गाजविली त्या लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय याच्यासाठी यंदाचे वर्ष खास आहे. `ती सध्या काय करतेय' या मराठी चित्रपटातून अभिनयने पडद्यावर दमदार पदार्पण केले. अनेक तरुणींची हृदये घायाळ केली त्याने. त्यामुळे अभिनयसाठी तसे हे वर्ष खासच. त्यातच आता गुढीपाडवा येत आहे. नवीन हिंदु वर्षाचा प्रारंभदिन.

गुढीपाडव्याच्या अभिनयच्या काही खास आठवणी आहेत. अभिनय म्हणतो `आमच्या घरी दरवर्षी आम्ही गुढी उभारुन गुढीपाडवा साजरा करतो. गुढी उभारताना होणारे सर्व धार्मिक विधी आम्ही यथासांग करतो. कोणतीही कसर बाकी ठेवत नाही. मी शाळेच्या हॉस्टेलमध्ये राहात होतो तोपर्यंत मला गुढीपाडव्याच्या सणाला नेमके काय करतात याविषयी फारशी माहिती नव्हती. परंतु जेव्हा हॉस्टेलमधून मी पुन्हा मुंबईत घरी कायमचा राहायला आलो तेव्हा प्रत्येक सणाच्या वेळी आईने माझ्यावर खास जबाबदारी सोपवायला सुरुवात केली.'

पुढे वाचा, अभिनय सांगतोय, आई प्रिया बेर्डेंनी त्याच्यावर सोपवलेली जबाबदारी...

Next Article

Recommended