मुंबईः अभिनेता सचिन पिळगांवकर यांना गुरुवारी 61 व्या वर्षात पदार्पण केले. सचिन यांनी वयाची साठी पूर्ण केल्याच्या निमित्ताने त्यांच्या पत्नी सुप्रिया पिळगांवकर यांनी एका जंगी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत मराठीसोबतच बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती लावून सचिन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, सचिन तेंडुलकर यांच्यापासून ते जया बच्चन, जॅकी श्रॉफ, जॉनी लिव्हर, बप्पी लहरी, सुरेश वाडकर, वैभव तत्त्ववादी, सुमीत राघवनपर्यंत अनेक सेलिब्रिटी या पार्टीत उपस्थित होते. या खास क्षणी सचिन यांनी एक मोठी घोषणा केली. तब्बल चार वर्षांच्या गॅपनंतर सचिन पुन्हा एकदा दिग्दर्शनात परतत आहेत. शिवाय ते एका नव्या भूमिकेत दिसणार आहेत. सचिन पिळगांवकर हे एक चांगले अभिनेते असण्यासोबतच खूपच चांगले दिग्दर्शक, निर्माते, गायक असल्याचे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. आता प्रेक्षकांना ते संगीतकाराच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. 'अशी ही आशिकी' या त्यांच्या नव्या सिनेमाची घोषणा त्यांनी या पार्टीत केली.
लक्ष्मीकांत बेर्डेंचा मुलगा असणार हीरो...
सचिन यांच्या या नव्या चित्रपटात दिवंगत अभिनेते आणि सचिन यांचे जीवलग मित्र लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे मेन लीडमध्ये झळकणार आहे. खरं तर अभिनयचे सतीश राजवाडे दिग्दर्शित 'ती सध्या काय करते' या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण दमदार पदार्पण झाले आहे. अभिनयच्या अभिनयाचेसुद्धा कौतुक झाले. पण या चित्रपटात तो मेन लीडमध्ये नव्हता. आता सचिन यांच्या चित्रपटातून अभिनय हीरोच्या रुपात झळकणार आहे. अभिनयविषयी सचिन म्हणाले, अभिनय माझ्या डोळ्यासमोरच लहानाचा मोठा झाला आहे. त्याचे पहिल्या चित्रपटातील काम उत्कृष्ट झाले. आता 'अशी ही आशिकी'मधून तो लीड रोलमध्ये झळकणार आहे.
अभिनेत्रीच्या शोधात...
अशी ही आशिकी या चित्रपटात अभिनयसोबत सचिन यांचीही एक महत्त्वाची भूमिका असणार आहे. पण अद्याप अभिनेत्रीचा शोध सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. सचिन म्हणाले, युथफूल लव्ह स्टोरी असलेल्या या चित्रपटासाठी आम्ही एका नवीन चेह-याच्या शोधात आहोत.
बघा, सचिन यांच्या बर्थडे पार्टीतील निवडक 7 PHOTOS...