आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक... \'जाणता राजा\'च्या प्रयोगावेळी रंगमंच कोसळला, 3 महिला कलाकार जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अपघात घडला तो क्षण... - Divya Marathi
अपघात घडला तो क्षण...

मुंबई: मुंबईतील विलेपार्लेमध्ये 'जाणता राजा' नाटकाचा प्रयोग सुरू असताना एक अपघात घडला. या अपघातात काही कलाकार जखमी झाले आहेत. बाबासाहेब पुरंदरे लिखित जाणता राजाचा प्रयोग पार्ले टिळक शाळेच्या पटांगणात सुरु असताना रंगमंचावरील एका बाजूचा बुरुज अचानक कोसळला. तिथे उपस्थित असणाऱ्या सहा ते सात कलाकारांना त्यामुळे दुखापत झाली. त्यांच्यावर प्रथोमपचार करुन त्यांना सोडून देण्यात आले. तर तीन महिला कलाकारांवर पार्ल्याच्या बाबासाहेब गावडे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या नाटकामध्ये जवळपास 300 हून अधिक कलाकार काम करतात. या प्रयोगाच्या शेवटच्या टप्प्यात ही दुर्घटना घडली.
पुढील स्लाईडमध्ये पाहा, या अपघाताची छायाचित्रे आणि व्हिडिओ...