आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Dream Comes True: \'कैवल्य\'ने खरेदी केली नवी गाडी, या मराठी सेलेब्सकडे आहेत आलीशान कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेत कैवल्य ही भूमिका साकारुन प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता अमेय वाघचे एक मोठे स्वप्न पुर्ण झाले आहे. अमेयने नुकतीच फोर्ड इको स्पोर्ट ही आलीशान गाडी विकत घेतली आहे. त्याने आपला हा आनंद आपल्या चाहत्यांसोबत साजरा केला. त्याने आपल्या नव्याको-या गाडीसोबतचा एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर करुन लिहिले, ''एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलाच्या आयुष्यात आलेला आनंद म्हणजे त्याची पहिली गाडी #fordecosport.''

अमेयप्रमाणेच मराठी इंडस्ट्रीतील काही सेलिब्रिटींचे गाडी विकत घेण्याचे स्वप्न गेल्यावर्षी सत्यात उतरले. या सेलिब्रिटींनी आपल्या नव्या गाडीसोबतची छायाचित्रे आपल्या सोशल नेटवर्किंग साइटवर शेअर केली आहेत. चला तर मग मराठी इंडस्ट्रीतील कोणकोणत्या सेलिब्रिटींकडे आहेत महागड्या आणि आलीशान कार जाणून घेऊयात पुढील स्लाईड्सवर...
बातम्या आणखी आहेत...