अतुल कुलकर्णी हे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध नाव. एक विचारवंत अभिनेता म्हणून ओळखले जाणारे अतुल कुलकर्णी आज आपला 50 वा वाढदिवस साजरा करत आहेत. सात भाषांमध्ये 70 हून अधिक सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणारे अतुल आता निर्माता म्हणूनही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. लवकरच रिलीज होणा-या \'राजवाडे अँड सन्स\' या सिनेमात काम करण्यासोबतच अतुल याचे निर्मातेसुद्धा आहेच.
आज त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला त्यांच्या खासगी आयुष्य आणि करिअरविषयी सांगत आहोत...
खासगी आयुष्य...
10 सप्टेंबर 1965 रोजी बेळगावमध्ये जन्मलेल्या अतुल यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण सोलापूर येथील हरिभाई देवकरण हायस्कूलमध्ये पूर्ण केले. त्यांचे आईवडिल सोलापूरला स्थिरस्थावर झाले. बारावी पर्यंत बेळगावमध्ये पूर्ण करून तेथील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळवला. मात्र आभियांत्रिकीमध्ये मन न रमल्यामुळे नंतर सोलापुरातील डी.ए.वी. महाविद्यालयातून इंग्रजी सहित्य या विषयात बी.ए. पूर्ण केले.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, पत्नी गीतांजलीसोबत कशी झाली होती अतुल यांची भेट आणि बरेच काही...