आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमलेश सावंत करणार उपेंद्र लिमयेची धुलाई, 'नकुशी'मध्ये झाली एंट्री, PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'दृश्यम' या सिनेमात पोलिसाच्या भूमिकेतील अभिनेता कमलेश सावंतनं अजय देवगणची केलेली धुलाई प्रेक्षकांना नक्कीच आठवत असेल. आता स्टार प्रवाहवरील 'नकुशी' या मालिकेतील रणजित शिंदेची कमलेश धुलाई करणार आहे. कारण, कमलेशनं 'नकुशी'मध्ये एंट्री केली असून, या मालिकेत तो पोलिसाचीच भूमिका साकारत आहे.

'नकुशी' या मालिकेत बऱ्याच घडामोडी झाल्या आहेत. नकुशीचं मिस कॅरेज झाल्याचा धक्का रणजित पचवू शकलेला नाही. त्यामुळे तो वाईट मार्गाला लागला आहे. एका प्रकरणात तो पोलिसांकडून पकडला जातो. त्याचा तपास सूर्यकांत वागळे या पोलिस इन्स्पेक्टरकडे असतो. या तपासादरम्यान सूर्यकांत वागळे रणजित शिंदेची धुलाई करतो.
 
कमलेश आतापर्यंत अनेक मालिका आणि चित्रपटांतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्यानं पोलिसाचीही भूमिकाही अनेकदा केली आहे. रफटफ लुक आणि उत्तम अभिनय ही कमलेशची खासियत आहे.

आता रणजितनं नेमकं काय केलेलं असतं म्हणून तो पकडला जातो, पोलिसांकडून झालेल्या धुलाईचा रणजित बदला घेतो का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं 'नकुशी' या मालिकेच्या पुढच्या भागांमध्ये मिळणार आहेत. मालिकेत रणजितची भूमिका अभिनेता उपेंद्र लिमये यांनी तर नकुशीची भूमिका अभिनेत्री प्रसिद्धी साकारत आहे.  

बघा, कमलेश सावंत यांची 'नकुशी' मालिकेतील छायाचित्रे... 
बातम्या आणखी आहेत...