आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Actor Lalit Prabhakar\'s Birthday Celebration On Set Julun Yeti Reshimgathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Xclusive: ‘जुळून येती..’च्या सेटवर साजरा झाला ललित प्रभाकरचा B’day, पाहा सेलिब्रेशनचे Photo

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेता ललित प्रभाकर वाढदिवसाला कधीच विशेष सेलिब्रेशन करत नाही. वाढदिवस हा नेहमी सारखाच एक दिवस असतो, असं तो मानतो. तो कधी वाढदिवसाची रजा मागत नाही. त्यामूळेच वाढदिवसाला तो ‘जुळून येती रेशीमगाठी’च्या सेटवर चित्रीकरणात व्यस्त होता. पण सकाळपासूनच प्रॉडक्शनच्या टीमने ललितच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करण्याचा प्लॅन बनवला होता.
लंच-टाइममध्ये ललितच्या वाढदिवसाचे छोटेखानी सेलिब्रेशन रंगले. ज्यात प्राजक्ता माळी, शर्मिष्ठा राऊत, गिरीश ओक, लोकेश गुप्ते आणि प्रॉडक्शनची टीम उपस्थित होती. सेटवरच झालेल्या ह्या साध्या सेलिब्रेशनमध्येही एक गोडवा जाणवत होता. ललितचे नाव ही थोडं क्रिएटीव्ह पध्दतीने ‘लleeत’ असे लिहीण्यात आले. ललितचा २८वा वाढदिवस असल्याने केकच्याभोवती टेबलवर २८ कँडल लावण्यात आल्या होत्या. दोन केक होते. एकावेळी दोन केक ललितने कापले.
ललित प्रभाकरला आता वाढदिवसाचे काय विशेष प्लॅनिंग, असे विचारल्यावर तो म्हणाला, “मी वाढदिवसाचा कधीच प्लॅन करत नाही. माझ्यासाठी तो नेहमी सारखाच एक दिवस असतो. घरी असेन, तर पुस्तक वाचतो, टीव्ही पाहतो, किंवा फिल्म पाहतो. आणि आता मालिका सुरू आहे, तर चित्रीकरण करतोय. माझा ‘जुळून येती’च्या सेटवरचा हा दूसरा वाढदिवस आहे. आणि आता शेवटचा वाढदिवस आहे, असं म्हणवे लागेल. कारण आता पुढच्या आठवड्यात मालिका संपतेय.”
ललितला अर्ध्या दिवसाने चित्रीकरणातून सुट्टी मिळाली होती. तर आता तडक घरी का, असं विचारल्यावर ललित म्हणतो, “ आता एका कार्यक्रमाला जाणार आहे. जिथे आयोजक दरवर्षी सेलिब्रिटींच्या हस्ते त्यांच्या आईचा सत्कार करतात. ह्यावर्षी तिथे मला बोलावले आहे. आणि योगायोग पहा, आज मी माझ्या वाढदिवशी माझ्या आईचा सत्कार करणार आहे. आणि ह्या सत्काराच्या निमीत्ताने सगळेसोबत असूच तर, मग आम्ही सत्कार झाल्यावर घरचे एकत्र कुठेतरी रात्री जेवायलाही जाऊ.”
ललितच्या एका चाहत्याने त्याच्यासाठी सेटवर केक पाठवला होता, “ रोहित नावाचा एक चाहता आहे, जो मागच्यावर्षी सोलापूरहून आला होता. यंदा तो पुण्यात होता, तिथून तो माझ्यासाठी केक घेऊन आला. दिवसभर सोशल नेटवर्किंगसाइट्स आणि फोन, मेसेजेसच्या माध्यमातून मित्र परिवार, चाहते आता शुभेच्छा पाठवत राहतील. पण मी जेव्हा अशा शुभेच्छांचा वर्षाव होतो, तेव्हा खरं तर बावरून जातो. मला थँक्यु असं फॉर्मल बोलताच येत नाही.”
(फोटो- प्रदिप चव्हाण)
पुढील स्लाइडमध्ये पाहा, काय देणार प्राजक्ता माळी ललितला भेटवस्तू ?