आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेता मंगेश देसाई साकारणार पडद्यावर भगवानदादांची भूमिका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ब्लॅक अँड व्हाइटच्या जमान्यात अॅक्शन आणि नृत्याने प्रेक्षकांना अक्षरश: डोलायला लावणारे दिवंगत अभिनेते भगवानदादा यांच्या जीवनावरील चित्रपटाला अखेर दोन वर्षांनंतर मुहूर्त लाभला आहे. काही कारणामुळे रखडलेला हा चित्रपट नव्या दिग्दर्शकाच्या टीमबरोबर आकारास येत असून ५ ऑगस्टपासून याचे चित्रीकरण सुरू होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक शेखर सरतांडेल यांनी खास "दिव्य मराठी'ला ही माहिती दिली.

किमया मोशन पिक्चर्सच्या डॉ. मोनीष बाबरे यांनी दोन वर्षांपूर्वी भगवानदादा यांच्या जीवनावरील हिंदी चित्रपटाला सुरुवात केली होती. मात्र, काही कारणांमुळे हा चित्रपट पुढे सरकू शकला नाही. आता 'एक अलबेला' (अंतिम नावावर अजून शिक्कामोर्तब झालेले नाही) या नावाने मराठीमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण होत आहे.

१९३० च्या काळात हिंदी चित्रपटसृष्टीत भगवान आबाजी पालव म्हणजेच भगवानदादा एक चलनी नाणे होते. त्यांचे अॅक्शनपॅक्ड चित्रपट पाहायला प्रेक्षक तुडुंब गर्दी करत. बॉलीवूडमध्ये अॅक्शनसाठी बॉडी डबलचा वापर करणारे, पहिला हॉरर चित्रपट निर्माण करणारे, "अलबेला'सारखा एव्हरग्रीन व सुमधुर गाण्यांनी नटलेला चित्रपट तयार करणारे, ४० गाड्यांचा ताफा स्वत:जवळ बाळगणारे भगवानदादा नंतर कर्जबाजारी झाले होते. त्यांची विपन्नावस्था चर्चेत आली होती. शेखर सरतांडेल यांनी याअगोदर स्वमग्नता या मानसिक आजारावर "माय डियर यश' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. आता ते भगवानदादांची कथा पडद्यावर आणत आहेत.

पुढे वाचा, 'अलबेला'ची दोन गाणी