आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'दुनियादारी'चा 'सॉरी' अडकला लग्नाच्या बेडीत, जाणून घ्या कुणासोबत बांधली लगीनगाठ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः 'दुनियादारी‘ या सुपरहिट मराठी सिनेमातील 'सॉरी' तुम्हाला आठवतोय ना.. बरोबर आम्ही बोलतोय ते मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता प्रणव रावराणेविषयी... मराठी सिनेमांसोबतच प्रणव रावराणे हे मराठी रंगभूमीवरील नावाजलेले नाव आहे. एक सात नमस्ते, आपण यांना पाहिलंत का?, लगे रहो राजाभाई, एक दोन तीन चार, तीन जीव सदाशिव, वा-यावरची वरात, वासूची सासू यांसह अनेक नाटकांमध्ये प्रणवने काम केले आहे. गेलं वर्ष म्हणजेच 2016 हे प्रणवच्या खासगी आयुष्याला महत्त्वाची कलाटणी देणारं ठरलं आहे. त्याचे खास कारण म्हणजे डिसेंबर 2016 मध्ये प्रणव बोहल्यावर चढला. त्यामुळे 2016 हे वर्ष त्याच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरलं, असं म्हणायला हरकत नाही. 

कोण आहे प्रणवची आयुष्याची जोडीदार...
प्रणवच्या पत्नीचे नाव आहे अमृता सकपाळ. प्रणवप्रमाणेच अमृतासुद्धा अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. अमृता छोट्या पडद्यावरील नावाजलेले नाव आहे. ‘माझे मन तुझे झाले’ या मालिकेतील ‘स्वामिनी’ ही अमृताने साकारलेली व्यक्तिरेखा लोकप्रिय झाली आहे. ठाण्याच्या ज्ञानसाधना महाविद्यालयात शिकत असताना अमृताने आंतरमहाविद्यालयीन एकांकिकेद्वारे अभिनयाची वाट चोखाळली. ‘एक कलावंत जगताना’ ही एकांकिका खूप गाजली होती. कॉलेज संपल्यानंतर कॉलेजच्याच एका हौशी नाटक मंडळी ग्रुपबरोबर अमृताने खुल्या गटातील नाट्यस्पर्धांमध्ये नृत्य, नाटक, एकांकिका या माध्यमातून काम केले आहे. त्यानंतर मोहन वाघ यांच्या बॅनरने नव्याने ‘ऑल दी बेस्ट’ची आखणी केली होती. त्यातील प्रमुख भूमिकेसाठी अमृताची निवड झाली आणि तिने व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केले. ‘लक्ष्मणरेषा’, ‘लज्जा’, ‘अवघाचि संसार’ यांसारख्या मालिकांबरोबरच अमृता सकपाळने ‘हरी माझ्या घरी’ हा एक सिनेमाही केला. ‘ऑल दी बेस्ट’, ‘ऑल दी बेस्ट म्युझिकल’, ‘भारत भाग्यविधाता’ ही अमृताची गाजलेली नाटकं आहेत. 

या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला प्रणव आणि अमृताच्या लग्नाची खास छायाचित्रे दाखवत आहोत. 

फोटो साभारः प्रणव रावराणे फेसबुक पेज 
बातम्या आणखी आहेत...