आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करताय पल्लवी-संग्राम, म्हणतात 'आम्ही एकमेकांसाठी परफेक्ट'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेनमेंट डेस्क - अभिनेत्री पल्लवी पाटील आणि अभिनेता संग्राम समेळ आज त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करत आहेत. आजच्या दिवशी मुंबईत यांचा विवाहसोहळा पार पडला होता. अभिनेता संग्राम हा अभिनेते अशोक समेळ यांचा मुलगा आहे. 'पुढच पाऊल' या मालिकेतून संग्रामने त्याचा वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे तर 'रुंजी' या मालिकेतून पल्लवी घराघरात पोहोचली होती. 

 
अशी आहे लव्ह स्टोरी...
संग्राम आणि पल्लवी एकमेकांचे चांगले मित्र होते. दोगेही लग्नाच्या विरोधात असल्याने त्यांचे चांगलेड जमत असे. संग्राम मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमालाही सुरुवात झाली होती. अशातच दोघे सहज एकमेकांना भेटण्यासाठी आउटींगला गेले आणि त्यादिवशी त्यांना क्लिक झाले. आपण दोघांनीच एकमेकांशी लग्न केले तर काय होईल असा विचार त्यांच्या मनाच चमकून गेला. घरी दोघांनी ही गोष्ट सांगितली आणि केवळ 8 दिवसांतच त्यांचे लग्न ठरले. लग्नानंतर दोघे थायलँडला त्यांचा हनीमून सेलिब्रेट करण्यासाठी गेले होते. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, दोघांच्या लग्नाचे खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...