आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actor Shashank Ketkar Got Angry With Fans Comments.

OMG: चाहत्याने केला शशांक केतकरचा अपमान, शशांकचा अनावर झाला संताप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शशांक केतकर
एरवी प्रेमळ दिसणारा श्री आणि नेहमीच शांत असलेला शशांक केतकर, संतापू शकतो, असं त्याच्या चाहत्यांना वाटणं शक्यच नाही. पण असं झालंय खरं. शशांक चिडावा, किंवा संतापून त्याने कोणाला तरी बोलावं, असं कारण घडलंय. आणि त्याला चिडायला कारणीभूत झालेली ही व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नाही तर त्याचा एक चाहता आहे.
झालं असं की, शशांक केतकरला गेल्या दोन वर्षांमध्ये त्याच्या सतत वाढत्या प्रसिध्दीमूळे फेसबूक आणि ट्विटर ह्या दोन्ही सोशल नेटवर्किंग साइट्सवर प्रचंड फॅन फॉलोविंग आहे. प्रसिध्दीच्या ब-या-वाईट दोन्ही बाजू असतात. जसे चाहते चांगल्या कामाची वाखाणणी करतात. तसेच, त्यांना एखादी गोष्ट खटकली तर सडेतोड बोलूनही टाकतात. आणि असंच पूढचा मागचा विचार न करता, दोन-तीन चाहत्यांनी शशांकच्या सहनशीलतेचा अंत पाहण्यासारखी गोष्ट केली.
याबद्दल सांगताना शशांक म्हणतो, “काहीही हं श्री वरून मध्यंतरी बरेच विनोद व्हॉट्सअपवरून फिरत होते. आम्ही त्या गोष्टी खूप खेळकर पध्दतीने घेतल्या. लोकांच्या प्रतिक्रिया आम्ही एकमेकांना वाचून दाखवतो. आणि चाहत्यांचा आदरही करतो. काहीही हं श्री, जान्हवीचे गरोदरपण, जान्हवीची आई कला ह्यांचा स्वभाव, अशा अनेक गोष्टींवर विनोद आणि प्रतिक्रियाही आलेल्या आहेत. पण म्हणून पातळी घसरून जेव्हा सोशल नेटवर्किंग साइटवरून विनोद केले जातात. तेव्हा मग राग येणं, सहाजिक नाही का? काही-काही वेळा तर संता-बंता एवजी श्री-जान्हवी यायला लागलं. आणि ह्या विनोदांचा स्तर घसरत चाललाय. हे लक्षात आलं. एकिकडे आमच्यावर उदंड प्रेम करणारे हेच प्रेक्षक, श्री-जान्हवीचे अश्लिल विनोद जेव्हा पाठवतात. तेव्हा ते मनाला लागतं.”
पुढील स्लाइडमध्ये वाचा, नक्की काय म्हणाले शशांकला त्याचे चाहते?