(शशांक केतकरची कुटुंबीय आणि मित्रांसोबतची छायाचित्रे)
अभिनेता शशांक केतकरला आज कोणत्याही वेगळ्या परिचयाची गरज नाहीये. 'होणार सून मी ह्या घरची' मालिकेमुळे शशांक घराघरांत पोहोचला आहे. याच मालिकेत काम करणारी त्याची सहकलाकार तेजश्री प्रधानसह शशांक खासगी आयुष्यात लग्नगाठीत अडकला. शशांक मुळचा पुण्याचा असून त्याने इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण पूर्ण केले. मात्र अभिनयाच्या ओढीने त्याने या क्षेत्राची निवड केली.
तसे पाहता शशांक खासगी आयुष्य जपणारा व्यक्ती आहे. फार लाइमलाइटमध्ये राहणे त्याला पसंत नाही. कुटुंबीय आणि मित्रमंडळीसोबत वेळ घालवणे त्याला पसंत आहे.
आज या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला शशांकचे त्याच्या कुटुंबीय आणि मित्रांसोबतचे निवांत क्षण छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा शशांकची खासगी छायाचित्रे...
(नोटः ही सर्व छायाचित्रे शशांकच्या फेसबुक पेजवरुन घेण्यात आली आहेत.)