आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Fun Loving आहे \'श्री\', पाहा कुटुंबीय-मित्रांसोबतचे त्याचे निवांत क्षण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(कुटुंबीय, मित्र आणि सहकलाकारांसोबत शशांक केतकर)
'होणार सून मी या घरची’ या मालिकेमुळे घराघरांत लोकप्रिय झालेल्या ‘श्री’ आणि ‘जान्हवी’ यांच्या खर्‍या आयुष्यातदेखील वादळ आले आहे. अभिनेता शशांक केतकर याने मालिकेप्रमाणेच खर्‍या आयुष्यातही पत्नी तेजश्रीपासून घटस्फोट मिळावा, यासाठी पुण्यातील फॅमिली कोर्टात अर्ज दाखल केला आहे. व्यक्तिगत व व्यावसायिक आयुष्यातील प्रसंगांचे दाखले त्याने या अर्जात दिले आहेत.

'श्री-जान्हवी'चे ख-या आयुष्यातही बिनसले, पुण्यात दाखल केला घटस्फोटाचा अर्ज

'होणार सून मी या घरची’ या मालिकेने शशांकला खरी ओळख प्राप्त करुन दिली. या मालिकेच्या सेटवरच तेजश्रीसोबत त्याचे सूत जुळले होते. अल्पावधीतच दोघांनी आपल्या प्रेमाचे रुपांतर लग्नात केले. मात्र वर्षभरातच दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला आणि शशांकने घटस्फोटाचा अर्ज दाखल केला.
जाणून घ्या शशांकच्या खासगी आयुष्याविषयी...
इंजिनिअर आहे शशांक...
अल्पावधीतच तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेल्या शशांकचा जन्म 15 सप्टेंबर 1985 रोजी पुण्यात झाला. शशांकने ठाण्यातील व्हीपीएम पॉलिटेक्निकमधून डिप्लोमा केला. त्यानंतर पुण्यातील के. डी. वाय. पाटील कॉलेजमधून त्याने इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. मुळात इंजिनिअर असलेल्या श्रीने ऑस्ट्रेलियातून मास्टर्स डिग्री मिळवली. याशिवाय तो एक राष्ट्रीय स्तरावरील स्विमरसुद्धा आहे. फोटोग्राफी, भटकंती हे शशांकचे आवडते छंद असून तो शाकाहारी आहे.
'पूर्णविराम' नाटकाद्वारे अभिनयाला सुरुवात...
शशांकने 'पूर्णविराम' या मराठी नाटकाद्वारे आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. 'कालाय तस्मैः नमः' ही शशांकची पहिली मराठी मालिका. त्यानंतर सुवासिनी, स्वप्नांच्या पलीकडे, फिरुनी नवी जन्मेन, या मालिकांमध्ये त्याने छोटेखानी भूमिका साकारल्या. 'रंग माझा वेगळा' ही शशांकची मुख्य भूमिका असलेली पहिलीच मालिका होती. मात्र शशांकला खरी ओळख मिळाली ती झी मराठी वाहिनीवरील 'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेमुळे. या मालिकेत शशांकने श्रीरंग नावाच्या उद्योजकाची भूमिका साकारली आहे. या मालिकेमुळे शशांक मराठी चित्रपटसृष्टीतील फ्रेश फेस असून तरुणींच्या गळ्याती ताईत बनला आहे.

व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण...
शशांकने नुकताच व्यावसायिक रंगभूमीवरसुद्धा प्रवेश केलाय. 'गोष्ट तशी गमतीची' या नाटकात शशांक महत्त्वपूर्ण भूमिका साकारतोय. दोन पिढ्यांमधील अंतर हा या नाटकाचा विषय आहे. याशिवाय शशांकचा 'यारा' हा एक नवीन अल्बमही रिलीज झाला आहे. या अल्बममध्ये शशांकने एक गीत स्वरबद्ध केले असून अल्बममध्ये तो झळकला आहे.
शशांक खासगी आयुष्य जपणारा व्यक्ती आहे. फार लाइमलाइटमध्ये राहणे त्याला पसंत नाही. कुटुंबीय आणि मित्रमंडळीसोबत वेळ घालवणे त्याला पसंत आहे. पुढे पाहा, कुटुंबीय आणि मित्रांसोबतची त्याची खास छायाचित्रे...
(नोट - सर्व छायाचित्रे शशांकच्या ऑफिशिअल फेसबुक अकाउंटवरुन घेण्यात आली आहेत.)