आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संत एकनाथ रंगमंदिराच्या दुरावस्थेवर सुमीत राघवनची नाट्यप्रयोग न करण्याची भूमिका, शिवसेनेला केले लक्ष्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - अभिनेता सुमीत राघवनने शहरातील संत एकनाथ रंगमंदीर येथील गलिच्छ अवस्था फेसबुक लाईव्ह व्हिडिओद्वारे सर्वांसमोर आणली आहे. तुटलेल्या खुर्च्या इतकेच काय ज्या स्टेजवर उभे राहून कलाकार सर्वांसमोर सादरीकरण करतात तो स्टेजही तुटलेल्या अवस्थेत व्हिडिओमध्ये दिसत आहे. सुमीत रावनसोबत अभिनेत्री स्वानंदी टीकेकरही व्हिडिओमध्ये दिसत आहे. 
 
सुमीत राघवन, स्वानंदी टीकेकर आणि इतर कलाकार 'एक शुन्य तीन' या नाटकाच्या प्रयोगासाठी शहरात दाखल झालेले आहेत. कलाकार अनेक तासांचा प्रवास करुन नाट्यमंदीरात येतात आणि त्यांना तिथे अशा गलिच्छतेचा सामना करावा लागतो याबद्दल सुमीत आणि इतर कलाकारांनी संताप व्यक्त केला. यावेळी त्यांनी औरंगाबाद महापालिका आणि शिवसेनेवर निशाना साधला. 
 
सुमीतने नाट्यमंदीरातील स्टेज, कलाकारांचे मेकअप रुमही यात लाईव्ह दाखवला. यामध्ये नाट्यमंदीरातील जीर्ण झालेल्या खुर्च्या, तुटलेले लाकडी स्टेज जिथे कलाकारांना उभे राहण्यासही भीती वाटत होती. स्त्रियांच्या मेकअपरुममधील अस्वच्छता, जागोजागी थुंकलेले तसेच अत्यंत घाण अवस्थेतील टॉयलेट होते. पुरुषांच्याही मेकअपरुमची याहून वेगळी काही अवस्था नव्हती.
 
सुमीत राघवनने आता  यानंतर औरंगाबादमध्ये नाट्यप्रयोग करणार नाही अशी भूमिका घेतली आहे. 
 
या व्हिडिओवर अनेक औरंगाबादच्या जनतेच्या प्रतिक्रिया येत आहेत. यातील बहुतेक जण सुमीतचे समर्थन करताना दिसत आहेत. 
 
(शेवटच्या स्लाईडवर पाहा व्हिडिओ)
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, संत एकनाथ रंगमंदीरातील काही दृश्ये...
 
हेही वाचा...
 
बातम्या आणखी आहेत...