आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Telly World: दुष्यंतच्या जीव धोक्यात, 'दुहेरी'मध्ये सुनील तावडेंचा नर्सचा अवतार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेते सुनील तावडे - Divya Marathi
अभिनेते सुनील तावडे
छोट्या पडद्यावरील 'दुहेरी' या मालिकेत लवकरच एक नवीन ट्विस्ट येणार आहे. दुष्यंतचा जीव धोक्यात असून परसू आता आपली नवीन खेळी खेळण्यास सज्ज झाला आहे. या मालिकेत अभिनेता सुनील तावडे परसू या बहुरंगी खलनायकी छटेच्या व्यक्तीरेखेत झळकत आहेत. परसूच्या भूमिकेला वैविध्य देताना त्यांनी आजवर अनेक व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. या विविध व्यक्तिरेखांचे आव्हान पेलत त्यांनी एक नवे आव्हान स्वीकारले असून यापुढे ते नर्सच्या रुपात दिसणार आहेत. या नव्या रुपामागे काही कारस्थान आहे का, हे पहाणं उत्सुकतेचं ठरणार आहे."
 
तावडे म्हणतात, "परसू वेगळा वाटण्यासाठी मी सतत प्रयत्न करत असतो. त्याचं हसणं वेगळं, त्याची बॉडी लँग्वेज वेगळी किंवा त्याची लकबही वेगळी वाटली पाहिजे. त्या दृष्टीनं मी हॉलिवूड अभिनेता हिथ लेजरची 'द डार्क नाईट' या चित्रपटातील जोकरच्या भूमिकेचा अभ्यास केला." 'द डार्क नाईट' मध्ये जोकरचा नर्सच्या वेशातील एक सीन प्रचंड लोकप्रिय ठरला होता.
 
तावडे यांनी सोशल मीडियामध्ये नर्सच्या गेटअपमधली फोटो नुकताच शेअर केला आहे. नर्सचे कपडे, अंबाडा, गळ्यात मंगळसूत्र, कपाळाला टिकली असलेला हा फोटो आहे. या फोटोला त्यांच्या चाहत्यांची मोठी दाद मिळाली असून, हजारो लाईक्स मिळाले आहेत. कारस्थानी परसूनं गेटअप बदलून काहीतरी चाल खेळली आहे. आता या नर्सच्या गेटअपमागे काही नवी खेळी आहे का हे जाणून घेण्यासाठी पहा 'दुहेरी' मालिकेचे येणारे एपिसोड बघायला हवे. 
 
पुढे बघा, नर्सच्या रुपातील सुनील तावडे यांची झलक...
बातम्या आणखी आहेत...