आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Friendship Day SPL: कोण आहेत, स्वप्निल जोशीचे 2 AM फ्रेंड्स? जाणून घ्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वप्निल जोशीचे बेस्ट फ्रेड्स
फ्रेंडशीप म्हटलं की, गेली दोन वर्ष पटकन तोंडावर येतो, तो ‘दुनियादारी’ चित्रपटातला डायलॉग. ‘तेरी मेरी यारी चल करेंगे दुनियादारी’. किंवा गाणं तोंडावर येतं, ‘दोस्तों की दुनियादारी में हसीं मेरी जिंदगी’.
ज्या स्वप्निल जोशीच्या ‘दुनियादारी’ फिल्मने दोस्तीला एक नवी परिभाषा दिली आणि सोबतच स्वप्निल जोशीचंही आयुष्य बदलून टाकलं. त्या स्वप्निल जोशीच्या आयुष्यात दोस्तीला खूप महत्वाचं स्थान आहे. आणि स्वप्निलच्या आयुष्यात एक नाही दोन नाही तर सात बेस्ट फ्रेंड्स आहेत.
सोनाली कुलकर्णी, मुक्ता बर्वे, सई ताम्हणकर, संजय जाधव, स्वप्ना वाघमारे-जोशी, अर्जुन सिंग बारन आणि कार्तिक निशानदार. स्वप्निल जोशीच्या आयुष्यात हे सप्तसूर असले की त्याला त्याच्या आयुष्याचा सूर गवसतो. आणि स्वप्निलच्याच शब्दात सांगायचं झालं तर ‘हे माझे 2 AM Friend आहेत’
स्वप्निलच्या ह्या प्रत्येक फ्रेंडचं एक खास वैशिष्ठ्य आहे. आणि हे वैशिष्ठ्य ‘फ्रेंडशिप डे’च्या निमीत्ताने स्वप्निल सांगतोय फक्त divyamarathi.comला.
पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या, मुक्ता बर्वेचं टोपण नाव स्वप्निल कडून